ताज्या बातम्याट्रेंडिंग

जेव्हा ती रात्री उशिरा प्रवास करते’… मुंबई लोकल मधील हा व्हिडीओ होतोय व्हायरल…

मुंबईच्या लोकांची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन, प्रत्येक दिवसाला लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. उशिरा रात्रीच्या वेळेस लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. (This video of a Mumbai local while traveling late at night is going viral…)

या प्रश्नाचे उत्तर मुंबई लोकलमधील एका व्हायरल व्हिडिओ मध्ये सापडले आहे. ‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या व्हायरल झालेल्या १५ सेकंदच्या या व्हिडिओतून सांगितले आहे.

जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते… असं कॅप्शन या तरुणीने व्हिडिओला दिल आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस जवान पाठमोरा उभा राहिलेला दिसत आहे. जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते, यावेळेस पोलिस दादा तिचे संरक्षण करण्यासाठी हजर असतो.

रात्रीच्या वेळेस पोलीस जवान महिला डब्यात तैनात असल्याने महिला प्रवासी सुरक्षित प्रवास करु शकतात. हे या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न तरुणीने केला आहे.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महिला मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. रात्रीच्या वेळेस गर्दी कमी असल्याने महिलांच्या डब्यात फारसे प्रवासी दिसत नाही. त्यामुळे उशिरा रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्यातिन्ही मार्गावर पोलीस जवान तैनात असतात.

या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून पोलिस जवानांचे आभार मानले आहेत. तीच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तर, अनेकांनी त्यांना सलाम देखील केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button