ताज्या बातम्याट्रेंडिंग

रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका!

आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, यात आपण एका तृतीपंथी शिक्षिकेचा प्रवास जाणून घेणार आहोत. होय तृतीयपंथी शिक्षिका शरीरातील बदलांमुळे पुरुष असून देखील त्यांना स्त्री सारखं जगावं लागतं. (Riya aavalekar became the country’s first transgender government teacher!)

अर्थात तृतीयपंथी बनण्यासाठी त्यांच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, परंतु समाजतील इतर वर्ग जवळ करत नसल्याने त्यांना हे जीवन जवळ करणे भाग पडत असते. असाच एका तृतीयपंथीचा प्रवास आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा, पर्यटन क्षेत्रात जगात प्रसिद्ध आहे.

तो शिक्षणात सुद्धा तितकाच अग्रेसर आहे. पण आता इथे एक वेगळी आदर्शवत क्रांती घडलेली समोर आली आहे. रिया आळवेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देशातील सुद्धा पहिल्या वहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका ठरल्या आहे. ही नक्कीच एक अनोखी बाब आहे.

त्यांचाच आता पर्यंतचा प्रवास कसा होता? या प्रवासात त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले? हेच आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाजतील इतर वर्ग जवळ करत नसल्याने तृतीयपंथींना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावाचे रहिवासी प्रवीण वारंग यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती.

त्यांच्या काकूंनी त्यांना शिक्षक बनायला सांगितले. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनले असं त्यांचे सांगणे आहे. प्राथमिक शाळेपासून ते डीएडपर्यंत शिक्षण घेत असताना, आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रवीणच्या मनात खदखदत होती. लहान असल्याने घरी सांगायची त्यांना भीती वाटत होती.

मात्र त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आळवेकर चा प्रवास केला. शिक्षण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालूक्यातील पाट गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत झाले. लहानपणीच आपण काहीतरी बनून आपले अस्तित्व निर्माण करायचे, या उद्देशाने त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकलं.

मात्र मनात एक खदखद होती ती म्हणजे आपण पुरुष नसून स्त्री असल्याच्या भावनेची. मनात होणारी हि घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर प्रशाशनाने त्यांना योग्य ती मदत केली.
२०१९ मध्ये प्रवीण यांनी आपली पहिली सर्जरी केली.

त्यांनतर सुद्धा त्यांनी पुरुषी वेशात आपले अध्यापनाचे काम सुरुच ठेवले. मे २०२२ मध्ये त्यांनी आपण तृतीयपंथी असल्याची माहिती प्रशासनाला दिली. त्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं. अखेर प्रवीणची रिया आळवेकर झाली आणि देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला.

मात्र हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले त्यांना लहानपणापासूनच चालण्यात, बोलण्यात आणि अगदी वागण्यात पावलोपावली बदल जाणवत होते. मात्र जन्म झाला तेव्हा घरातले मुलगा झाला म्हणून खूप जास्त आनंदी होते. जेव्हा त्यांना आपण पुरुष नसून स्त्री असल्याच्या भावना समजत होत्या, त्यावेळी ते कुणालाही सांगू शकत नव्हते.

त्यामुळे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहून आपण आपलं अस्तित्व सिद्ध करायचं त्यांनी ठरवलं आणि अखेर प्रवीणची लहानपणापासून होणारी घुसमट, मनातली खदखद दूर झाली. त्यांना देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान मिळाला.
देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज मला अभिमान आहे.

यासाठी मला माझं कुटुंब, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाणे खूप सहकार्य केले असल्याचे त्या सांगतात. आज रिया आळवेकर या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका असल्या तरी देखील काही तांत्रिक बाबी लक्षात घेत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या इथे स्वीय सहाय्यक म्हणून तात्पुरतं काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button