ताज्या बातम्याट्रेंडिंग

संतोष आग्रे : बारावी नापास असून या शेतकऱ्यानं वर्षभरात केला कोट्यवधींचा टर्नओव्हर…

न्युज पेपर वाचत असतांना किंवा सोशल मीडिया वर, नेहमी शेतकरी आत्महत्येच्या बातम्या बघायला मिळतात, ऐकू येतात. देशात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत असताना ,एका शेतकऱ्यानं कमालच करून दाखवली. (Santosh Agre: The 12th failed farmer made a turnover of crores in a year)

संतोष आग्रे,या बारावी नापास शेतकऱ्यानं वर्षभरात कोट्यवधींचा टर्नओव्हर करून दाखवला. आता तो त्याने कसा केला,हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.

संतोष आग्रे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील बाभुळगावमध्ये राहतो. त्याच्या कडे दीड एकर शेती आहे. दहावी झाल्यानंतर संतोष शहरात नौकरी करायला गेला. ७,८ वर्ष औरंगाबादच्या खासगी संस्थेत काम केलं.

पण तिथं त्याला काही जमल नाही, म्हणून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. पण गावाकडे जाऊन काय करणार होता,घरी १ एकर शेती त्यात, काहीच भागणार नाही म्हणून घरचे त्याला परत यायला नकार देत होते.

पण संतोष तरीही परत आला आणि गाव कडे परत आल्या नंतर त्यानी ६ वर्ष शेळीपालन केलं,त्यातून त्याची शेती क्षेत्रातील जाणकारांशी ओळखी झाल्या. आणि पुढे २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात संतोष यानी शेतकरी उत्पादक कंपनी एफपीओ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

पण आता ही कंपनी काय,आणि त्यांनी ही कशी स्थापन केली असावी. कारण कुठली ही कंपनी उभी करायची म्हटलं तरी लोक हवेत .. पैसे हवा. मग त्याचे मार्गदर्शक दीपक जोशी यांच्या समाजवल्या नंतर, त्यांनी गावातील काही सुशिक्षित बेरोजगारांना सोबत घ्यायचे ठरवले.

खूप मेहनतीनं १० जणांना तयार करत बाभुळगावकर मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, या नावानं शेतकरी उत्पादक कंपनीची ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंदणी केली. आता या कंपनीचे सगळे सदस्य अल्पभूधारक म्हणजेच ५ एकरच्या आतील शेती असणारे आहेत.

त्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करून १ लाखांच्या भांडवलावर कंपनी सुरू केली. शेयर कॅपिटल म्हणून गोळा केलेले दहा-दहा हजार रुपये वापरून, सुरुवातीला त्यांनी मका खरेदी करायला चालू केली.

सदस्यांच्याच घरचा मका आधी खरेदी केला. त्यातून आणखी थोडं भांडवल उभं राहिलं. ते एक दीड महिन्यानंतर त्यांनी त्यांच्या सदस्यांना परत केलं. त्यातून मग बाकीच्या लोकांची मका खरेदी चालू केली.

गेल्या वर्षी या कंपनीकडे केवळ गावातलेच लोक माल विक्रीसाठी घेऊन आले. कारण, कंपनी नवीन असल्यामुळे पैसे देईल की नाही, अशी शंका लोकांच्या मनात होती. यंदा मात्र जवळपासच्या ४ खेड्यातील लोक त्यांच्याकडे मका आणि सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

ज्या दिवशी मका घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते चेक द्वारे शेतकऱ्यांना पेमेंट करतात. बाकीच्या व्यापाऱ्यांपेक्षा क्विंटलमागे दहा-वीस रुपये वाढवून सुद्धा देतात. वर्षभरात त्यांनी जवळपास एक हजार टनापर्यंत माल खरेदी केला.

त्यात गहू, मका, सोयाबीन, तूर, हरभरा आहे. त्यांनी बँक स्टेटमेंट काढलं असून, जवळपास 1 कोटींच्या पुढे टर्नओव्हर गेलेला आहे,आता इथून पुढे कंपनीला जो नफा राहणार, त्यानुसार जे शेतकरी त्यांच्याकडे शेतमाल विकतील.

त्यांना दिवाळीला बोनस वाटप करण्याचा संतोष यांचा निर्धार आहे. हे सगळं करत असताना संतोष या शेतकऱ्याच्या आयुष्यातही मोठा बदल झालाय, त्यानी कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केलाय, मळणीयंत्रही घेतलंय.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारीही होऊ शकतो, हे संतोषनी करून दाखवलं. आधी व्यापाऱ्याकडे माल घेऊन गेल्यास तो माल ते हातात घ्यायचे.

व्यापारी चावून बघायचे आणि तेच त्यांचा मॉईश्चर असायचं. ते बघून भाव काही पण सांगायचे, तिथं मग शेतकऱ्यांची लूट व्हायची.त्यामूळे संतोष म्हणतो की शेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करून शेतकऱ्यांना फायदा करून दिला पाहिजे.

आता संतोष जवळ असलेल्या पैश्यांनी व्यापार कसा वाढेल याकडे तो लक्ष देतोय….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button