ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘सोन्या’ मेंढा करतोय वर्षाला करोडोची कमाई, जाणून घ्या हा मेंढा इतका चर्चेत का?

आजवर तुम्ही घोडा, म्हैस, बैल यांची किंमत नक्कीच लाखांच्या घरात ऐकली असेल, पण तुम्ही एखाद्या मेंढ्याची किंमत लाखांच्या घरात असल्याचे ऐकले आहे का? कदाचितच असं काही तुमच्या कानावर आलं असेल. मात्र आज आम्ही ज्या मेंढ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, तो अतिशय दुर्मिळ प्रजातीचा बोकड आहे. या मेंढ्याची किंमत तब्बल ५५ लाखांवर येऊन पोहोचली आहे. या मेंढ्याला इतकी किंमत असावी असे त्याच्यात काय विशेष आहे? हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात. (‘Sonya’ ram is earning crores of rupees a year, know why this ram is so popular?)

एक वर्षांपूर्वी ‘मोदी’ या मेंढ्याची चर्चा चांगलीच रंगली होती. हा मेंढा होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे राहणारे बाबू मेटकरी यांचा. ‘मोदी’ नावाच्या मेंढ्याकरिता तब्बल ७१ लाखांची मागणी आली होती.

मात्र कोवीड महामारी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या कोकरू ला देखील लाखांच्या घरात किंमत मिळत आहे, मात्र बाबू मेटकरी या कोकरू ला विकणार नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. ‘मोदी’ या मेंढ्याला विकून बाबू मेटकरी यांनी स्वतःचा आलिशान बंगला तर उभा केलाच, सोबतच त्यांनी जमीन देखील खरेदी केली.

आता या मेंढ्यांमध्ये इतके विशेष काय? हा प्रश्न तर आपल्याला पडलाच असेल. तर या मेंढ्या अतिशय दुर्मिळ प्रजातीच्या आहेत. म्हाडग्याळ जातीच्या मेंढ्यांना प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक क्षेत्रात या मेंढ्या आढळतात. सहा फूट उंची, मोठी मान आणि अर्धचंद्रकोर असणारे नाक हे त्यांचे वैशिष्ट्य असते.

बाबू मेटकरी यांनी आपल्या मेंढ्याचं नाव ‘मोदी’ यासाठी ठेवलं होत कारण त्याला देशभरातील बाजारात महत्वाचे स्थान होते आणि तो जिथे पण जायचा तिथे सर्व त्याचे फॅन व्हायचे. याच ‘मोदी’ मेंढ्याचे कोकरू देखील अवघ्या डिड वर्षांचे असून सुद्धा रुबाबदार दिसते आणि त्याचे नाव देखील ‘मोदी’ मेंढ्या प्रमाणेच सर्वत्र पसरले आहे.

‘सोन्या’ ला खरेदी करण्याकरिता लोक ५५ लाख रुपये देण्याकरिता सुद्धा तयार आहेत आणि यामुळेच बाबू मेटकरी व त्यांचा सोन्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

सोन्या ची खुराक देखील तितकीच जोरदार आहे, ज्यात त्याला दिवसभरातून दोन वेळा एक- एक लिटर दूध, सोयाबीन, १ किलो मक्का आणि ज्वारी.. वेळो वेळी रोजच्या आहारात दिली जाते. सोबतच त्याला मोकळ्या मैदानात इतर मेंढ्यांसोबत फिरवले देखील जाते.

सोलापूरचे बाबू मेटकरी आपल्या प्रत्येक मेंढीची काळजी घेतात, आणि यामुळेच त्यांनी सोन्याला विकायचा नकार दिला आहे. बाबू मेटकरी यांचे सांगणे आहे की, मी सोन्याच्या कोकरुंना विकूनच आनंदी आहे. सोन्याचे आता तब्बल ९ कोकरू आहे ज्यातील केवळ एकाचीच किंमत ५ ते १० लाखांच्या घरात आहे.

या मेंढ्यांचे मालिक बाबू मेटकरी मेंढ्यांच्या कोकरुंना विकून महिन्याला लाखोंची कमाई करतात. बाबू मेटकरी सांगतात, की सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकण्यापेक्षा सोन्याची अंडी विकूनच कमाई करावी.

ते असे देखील सांगतात की जस – जशी सोन्या पिल्लं देतील तस तशी तिची किंमत वाढेल आणि आता ५५ लाख रुपये किंमत असणारी सोन्याची किंमत काही दिवसात १ कोटींवर जाऊन पोहोचेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button