ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

अशाप्रकारे घ्या तुमच्या कारची काळजी…

एखादी गाडी घेणं ही आपल्या आयुष्यातील मोठी घटना असते. त्यामुळे हे वाहन एकदा का आपल्या कुटुंबात सामील झालं की त्याची घेणं ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

आपल्या कारची काळजी घेताना गाडीबद्दलच्या छोट्या आणि मोठ्या अडचणी येत असतात. त्या दूर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सची गरज आहे. या कोणत्या टिप्स आहेत, हे आपण लेखातून जाणून घेऊयात.

गरम पाण्याने चेप काढणे
बर्‍याच लोकांना असे वाटते की चेप काढणे खूपच अवघड आहे, हे खरं तर तितकंसं अवघड नाही. एखाद्या भांड्यात थोडेसे पाणी उकळून घ्या, ते जिथे चेप आला आहे त्या ठिकाणी ओता आणि नंतर प्लंजर किंवा दट्ट्या त्या ठिकाणी लावून ओढून काढा.
गाडीच्या बाह्यभागावर थोडासा चेप जास्त काळजी न करता काढला जाऊ शकतो; नुकसान किरकोळ असल्यास, चेप पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. पण जर नुकसान थोडं असेल आणि तो ठळकपणे दिसत असेल तर वाहनाचं सौंदर्य कमी होऊ शकतं.
हेड लाईट स्वच्छ करा.
तुमच्या गाडीच्या हेडलाइट्समधून स्वच्छ प्रकाश पडत नसेल तर जवळच्या मेकॅनिककडे धाव घेण्याची आवश्यकता नाही! तुमच्या समस्येवर तुमच्या घरी याचा उपाय आहे. टूथपेस्ट, ज्यामध्ये स्वच्छता करणारे रासायनिक घटक सौम्य प्रमाणात असतात,
ज्यामुळे जो अस्वच्छ पदार्थांचा थर जमा झालेला असतो, ते पदार्थ दातांइतकेच हेडलाइट्सनाही चकचकीत करतात. थोडीशी टूथपेस्ट आणि ग्रीससह हे हेडलाईट्स साफ केलेत तर तुमचे हेडलाइट्स पुन्हा स्वच्छ प्रकाश देतील.
प्लास्टिक शीट लावून चकाकी कमी करा
जर तुम्ही तुमचे गॉगल विसरलात आणि सूर्यास्ताच्या वेळी घरी जाताना सूर्य किरणं काचांवर पडल्यामुळे तुम्हाला समोरचं नीट दिसत नाही. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीच्या काचांना घरच्या घरी साध्या प्लास्टिकच्या शीट्स बसवू शकता. या गडद शीट्समुळे सूर्यकिरणांचा हा त्रास होणार नाही.
कोलाने तुमची चाके स्वच्छ करा
तुम्ही कदाचित कैक वेळा “स्वच्छता करण्यासाठी कोला वापरा” ही गोष्ट सांगताना ऐकली असेल, परंतु कोला आणि डिश डिटर्जंटचे मिश्रण तुमच्या रिम्समधील सर्व प्रकारची घाण आणि ब्रेकवर असणारी धूळ काढून टाकू शकते, परंतु काही लोक विचारात पडतात की सोडा सगळं चिकट करून टाकेल, परंतु डिटर्जंट वापरून हे टाळले जाते. म्हणून हे योग्य मिश्रण वापरल्याने चाकं पुन्हा चमकतात.
लहान स्क्रॅचवर नेल पॉलिश वापरा.
तुमच्या कारच्या बाह्य भागावर फक्त किरकोळ ओरखडे किंवा स्क्रॅच आले असल्यास, त्याची दुरुस्ती करण्यासाठी फारसा खर्च करावा लागत नाही. तुमच्या गाडीचा आधीचा सुंदर लुक परत आणण्यासाठी नेल पेंटचा वापर करणं आवश्यक आहे.
जर तुम्ही तुमच्या गाडीच्या रंगाशी मिळता जुळता रंग असणारं नेल पॉलिश वापरूनही प्रभावीपणे ओरखडे झाकले जातील जेणेकरून गाडीचं सौंदर्य अबाधित राहील.
तुमचे टायर उडत असतील तर ब्रेक लावू नका.
हा महत्वाचा सल्ला आहे. सरळ रस्त्यावर किमान ६५ किलोमीटर प्रति तास प्रवास करताना तुमचा टायर फुटला तर थांबू नका.
त्याऐवजी तुमचा पाय एक्सीलरेटरवर ठेवा. हे तुम्हाला तुमच्या वाहनावरील नियंत्रण ठेवण्यास आणि रस्त्यावर सरळ रेषेत जाण्यास मदत करेल. यास काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागू नये. एकदम ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.

अशा प्रकारे काळजी घेऊन आपण आपल्या प्रिय वाहनाचं आयुष्य अधिकाधिक काळ कसं वाढेल, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून केवळ तुम्ही स्वतःच्याच नाही तर तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या गाड्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना हा लेख नक्की शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button