केस ओढत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी, बॉयफ्रेंडवरून झाली वादाची सुरुवात…
मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. (Freestyle fight of hair pulling girls, argument over boyfriend)
त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच एक बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच मुली जबरदस्त चोप देताना दिसून येत आहेत. कुणी या मुलीचे केस ओढतंय तर कुणी तिला ढोसे हाणतंय, कुणी लाथा घालतंय.
तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. या दरम्यान एक मुलगा या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसून येत आहे. पण तरी सुद्धा या मुलीला मारहाण करणं सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
हा व्हिडीओ एका जत्रेमधला असल्याचं बोललं जातंय. सोनपूर येथे एका जत्रेचं आयोजन करण्यात आलं होत. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या तरुणीला मारहाण करण्यात आली, ती एका दुसऱ्याच मुलीच्या प्रियकरासोबत जत्रेत फिरत होती.
या जत्रेत त्या मुलीला आणि प्रियकराला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर तुफान राडा झाला. दरम्यान, ज्या मुलींमध्ये हा राडा झाला, त्या नेमक्या कुठल्या आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
या राड्यावेळी एकाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्या मध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.