ताज्या बातम्याट्रेंडिंग

सलमानच्या बिग बॉस १६ मध्ये एंट्री घेणारे पुण्यातील गोल्डन बॉईज आहेत तरी कोण?

सर्वात कॉंट्रोव्हर्शिअल शो अशी बिग बॉसची ओळख. बिग बॉस म्हंटल तर वाद आलेच आणि यामुळेच लोक हा कार्यक्रम बघणं कदाचित जास्त पसंत करतात, बिग बॉस ला चांगली टीआरपी मिळत असल्यामुळेच तर त्याचे सीझन्स देखील वाढतच आहेत. सलमान खानच्या बिग बॉसचे १६ वे सिझन आता सुरु आहे. (Who are the golden boys from Pune to enter Salman’s Bigg Boss 16?)

सध्या महाराष्ट्रात हिंदी बिग बॉस ची चर्चा रंगलेली आपण पहिले असेल. याचे कारण म्हणजे या सीझनमध्ये पुण्यातील गोल्डन बोईझ ची झालेली वाईल्ड कार्ड एंट्री. होय, पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरे याने सलमानच्या बिग बॉस मध्ये एंट्री घेतली आहे. तर आज आपण आपल्या हटके अंदाजामुळे ओळखला जाणारा सनी वाघचौरे कोण आहे? आणि त्याची इतकी चर्चा का होत आहे? हेच या माध्यमातून जाणून घेऊयात.

तर बिग बॉस शो पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये, वाईल्ड कार्ड एंट्री नेमकी कुणाची होणार? याची उत्सुकता होती. गोल्डन बॉईज ची एंट्री पाहून शो च्या चाहत्यांसोबत घरातील सदस्यांनाही धक्काच बसला. कारण याची कल्पना कुणालाच नव्हती. काही दिवसांपूर्वीच आपण बिग बॉस शो मध्ये एंट्री करणार असल्याचे सनी नानासाहेब वाघचौरे याने एक पोस्ट शेअर करत सांगितले होते, या पोस्ट वरुन आपल्याला नक्कीच अंदाज येईल की त्यांची लाईफ किती लक्ससुरीअसं आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड समवेत सनी वाघचौरे हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सनीला फार पूर्वी पासून अंगावर सोन घालायची आवड आहे. इतकच नाही तर अगदी त्याच्या मोबाइलपासून तर बुटापर्यंत सर्व वस्तू सोन्याच्या आहेत. विशेष म्हणजे सनीने आपल्या कारलाही सोन्याचा मुलामा दिला आहे. हि कार देखील महागडी ऑडी कार आहे.

सनी आपल्या लुक्समुळे जरी कायम चर्चेत असला तरी या सर्व लूक सोबत तो तब्बल पाच किलो सोन आपल्या अंगावर घालतो. इतकं सोन अंगावर असल्यामुळे त्याच्यासोबत कायम त्याचे अंगरक्षक असतात. सनी केवळ सोने परिधान करण्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर तो ब्रँडेड कपडे आणि शूजही घालतो. त्याच्याकडे चष्म्याचे देखील स्टाईलिश कलेक्शन आहे.

सनी हा कॉमेडीयन कपिल शर्माचा चांगला मित्र आहे, व हिंदी सिने सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्याची ओळख आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तो कायम कलाकारांसोबतचे फोटोज पोस्ट करत असतोच. सनीच नाही तर त्याचा मित्र संजय गुजरने देखील बिग बॉस मध्ये एंट्री केली आहे आणि दोघेही आपल्या याच लुक्सकरिता फेमस आहेत.

इंस्टाग्रामवर सनी वाघचौरेचे १. ६ मिलियन फॉलोवर्स आहे तर संजय गुजरचे १ मिलियन फॉलोवर आहेत. मध्यंतरी सनी वाघचौरे चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्यावर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्यापरकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीने तक्रारीमध्ये सनीवर बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा व मारहाणीचा आरोप केला होता आणि आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे बिग बॉस मुळे.

बिग बॉस मध्ये सर्वात जास्त वादग्रस्त स्पर्धक असणाऱ्या एम सी स्टॅन ला हे गोल्डन बॉईज टक्कर देऊ शकतात अश्या चर्चा सुरु आहेत, कारण एम सी स्टॅनलाही दागिन्यांची प्रचंड आवड आहे आणि गोल्डन बॉईजची तर ओळख त्यांना दागिन्यांमुळेच मिळाली आहे.

यासोबतच यंदाचे सिझन इंटरेस्टिंग बनवणाऱ्या मराठमोळ्या शिव ठाकरेला गोल्डन बॉईज टक्कर देतील असे बोलले जात आहे, मात्र खरंच हे दोघे शिव ठाकरेला टक्कर देतील कि त्यांच्यात मैत्री पाहायला मिळेल हे येणाऱ्या भागात कळेलच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button