ताज्या बातम्याट्रेंडिंग

गौतमी पाटील च्या लावणीने पुन्हा राडा, पोलिसांनी तिलाच बसवलं गाडीत…

लावणी ही पूर्वीपासूनच लोकांना आवडत आली आहे. लावणी मध्ये केलेलं नृत्य हे सगळ्यांच्या मनाला भावून जाणारे असते. पण लावणीच्याच नावावर अश्लीलतिचे प्रदर्शन करणे हे काही योग्य नाही. (The dance performed by Gautami Patil created chaos again,The police put her in the car)

हो ना… नुकतेच लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या खूप चर्चेत आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने अंगावर पाणी ओतले होते.

सोबतच विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला गेला.

अलीकडेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता याच पाठोपाठ खंडोबा यात्रेदरम्यान पुन्हा एकदा गौतमीच्या लावणीच्या वेळी धुडगूस पाहायला मिळाली आहे.

तुळजापूर तालुक्या मधील वडगाव येथे खंडोबा यात्रेदरम्यान गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण झाडावर चढून बसलेले होते.

गौतमीची लावणी सुरु झाली आणि गर्दीला असा जोश चढला की त्यामुळे पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली. गर्दीला थांबवण्यासाठी तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान या गर्दीतून बाहेर पडताना गौतमीच्याही नाकी नऊ आले. गौतमीला बाहेर काढण्यासाठी तिला पोलिसांनी चक्क गाडीत बसायला सांगितले आणि मग त्या चाहत्यांमधून तिची सुटका झाली.

गौतमी पाटील ही कितीही हिट असली तरी त्याचे कारण तिचा उत्तम डान्स नव्हे अश्लील स्टेप व अंगविक्षेप आहेत असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

गौतमी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते ज्यावर लाखो व्ह्यूज असूनही त्यावर वाईट कमेंट्स देखील असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button