ताज्या बातम्याट्रेंडिंग

तुमच्या उभ्या कारला दुसऱ्या वाहनाने धडक दिली तर? अशी मिळवता येईल नुकसान भरपाई…

प्रत्येकजण स्वतःच्या वाहनाला घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे जपतो. ती कार असो किंवा बाईक. त्याला थोडं जरी खरचटलं तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटत. इतक्या पैशाने आपण ती घेतो आणि त्यामुळेच आपण त्या गाडीची इतकी काळजी करत असतो. (What if your parked car is hit by another vehicle? Such compensation may be obtained)

पण समजा जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने कुठे गेलात आणि तिला पार्किंग मध्ये पार्क केली आणि त्या उभ्या कारला अचानक कुणी धडक दिली तर… त्यावेळेस काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? तर याच बद्दल आपण आज यामध्ये चर्चा करणार आहोत. एखाद्या वेळेस कामानिमित्त वाहन घेऊन जेव्हा कुणी जातो तर स्वतःच वाहन सुरक्षित राहावं असं प्रत्येकाला वाटत असत.

त्यामुळे ते वाहन पार्किंगमध्ये लावण्यास प्राधान्य दिल जात. पण बऱ्याचदा आपण सुरक्षिततेचा विचार करून पार्किंगमध्ये स्वतःच वाहन लावलं असेल, तरी सुद्धा उभ्या असलेल्या वाहनाला पाठीमागून आलेल्या एखाद्या वाहनाची धडक बसते आणि मोठ्या प्रमाणात वाहनाचे नुकसान होते.

त्यावेळेस राग अनावर होणं हे स्वाभावीक आहे. कारण आपल्या आवडत्या कारला ज्याची आपण इतकी काळजी घेत असतो तिला साधं खरचटलं तरी सुद्धा प्रचंड वाईट वाटत. आणि इतकं कुणी आपल्या कारच नुकसान करेल तर किती वाईट वाटणार. पण जर का कुणाच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पार्क केलेल्या कारच नुकसान झालं असेल.

तरी काही घाबरण्याचं कारण नाही. यावर सुद्धा सहज उपाय निघू शकतो. वाहनाला धडक बसल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. चला तर बघुयात कुठल्या आहेत या महत्वाच्या गोष्टी. पहिले म्हणजे थर्ड पार्टी क्लेम दाखल करा.

जर धडक देणाऱ्या वाहनाचा मालक धडक दिल्या नंतर कार जवळ तुमची वाट बघत असेल किंवा त्या व्यक्तीच्या हातून ते चुकून झालं असेल आणि तो त्याची चुकी मान्य करून, तुमचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या तयारीत असल्याचं समजून घ्यावं.

अश्या परिस्थितीमध्ये कारची नुकसान भरपाई मिळवण्यासाठीची प्रक्रिया फार सोपी होऊन जाते. अशी जर परिस्थिती आली तर अपघात ज्या व्यक्तीमुळे झाला त्या व्यक्तीशी संपर्क साधायचा आणि त्या व्यक्तीच्या वाहन विम्यांतर्गत थर्डपार्टी क्लेम दाखल करायचा.
दुसरं म्हणजे धडक देणाऱ्या चालकाचा शोध घेणे.

जर पार्किंगमध्ये तुमच्या उभ्या असलेल्या वाहनाला धडक देऊन त्याव्यक्तीने कुठलाही संपर्क न करता किंवा कुठली माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला असेल, तर भरपाई मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. अश्या स्थिती मध्ये हिट अँड रन अ‍ॅक्सिंडेट मानले जाते.

धडक देणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेऊन, तुमच्या कारची नुकसान भरपाई मिळवणं आणखीनच जास्त अवघड होऊन जात. जर अपघात घडवणाऱ्या चालकाचा शोध घेण्यात तुम्हाला यश आलं तर त्याच्याविरुद्ध तुम्ही थर्ड पार्टी कार इन्शुरन्स क्लेम दाखल करू शकता.

अश्या परिस्थितीमध्ये तो कार चालक तुमच्या कारच्या नुकसानाची भरपाई करून देणार. जर दोषी चालकाचा शोध घेण्यात अपयश आलं तर कारची दुरूस्ती स्वत:च करावी लागणार. कारला धडक देऊन एखादा चालक पळून गेल्यास काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात.
पहिले म्हणजे आरोपी ची माहिती नोदनवून ठेवणे.

दुसरे म्हणजे अपघात ज्यांच्यासमोर झाला असे तो साक्षीदार शोधणे. तिसरं म्हणजे एफआयआर दाखल करणे. चौथे म्हणजे इन्शुरन्स प्रोव्हाइडरला माहिती देणे. तर तुमच्या लक्षात आलं असेलच की उभ्या वाहनाचा जर अपघात झाला तर घाबरून न जाता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button