ताज्या बातम्याट्रेंडिंग

श्वानाने तोंडात धरला विषारी साप, शेवट जे झालं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही…

माणूसच नव्हे तर प्राण्यांसाठी सुद्धा साप हा जीवघेणा ठरू शकतो हे प्रत्येकाला चांगल्याने ठाऊक आहे. पण एका श्वानाने मात्र सापाशी पंगा घेतल्याचे दिसून आले आहे. (A dog caught a poisonous snake in its mouth, you won’t believe what happened in the end…)

साप दिसताच त्याला आपल्या जबड्यामध्ये धरले आणि त्यानंतर जे घडलं ते भयंकर होत. असं काही घडेल याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल.

सोशल मीडियावर कुत्रा आणि सापाचा हा धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती गाडीखाली काठी टाकून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

त्या व्यक्तीजवळ एक कुत्रासुद्धा दिसतो आहे. काही वेळातच त्या गाडीच्या खालून एक साप खाली पडतो. त्यावेळी कुत्रा गाडीच्या खालीच असतो. जसा साप पडतो तसा क्षणाचाही विलंब न करता कुत्रा त्याच्यावर तुटून पडतो.

त्या सापाला आपल्या जबड्यात धरतो. आता कुत्र्याने सापाला जबड्यात धरलं म्हणजे आता या कुत्र्याचं खरं नाही असंच तुम्हाला नक्की वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र उलटच घडतं.

कुत्रा त्या सापाला जबड्यात धरून खेचत घेऊन जातो आणि त्याला आपटत राहतो. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत तो आपटत राहतो, पण आपल्या तोंडातून काही सोडत नाही.

हा जॅक रसल प्रजातीचा श्वान आहे. ज्याची सापाशीही लढण्याची क्षमता असते. विषारी सापांनासुद्धा हा श्वान कधीच घाबरत नाही.
ए. एफ. रँच इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कमेंट मध्ये श्वानाच्या हिमतीला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button