ताज्या बातम्याट्रेंडिंग

सोलापूरचे बिडी घरकुल, जिथे प्रत्येक घरात बनवली जाते बिडी…

तंबाखु आणि बिडी हे आपल्या शरीरासाठी घातक असते .हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे ,घरा- घरात प्रत्येक महिला ही बिडी बनवण्याचा व्यवसाय करते. आणि त्यावरच त्यांचा पूर्ण महिना चालतो. ऐकतांना थोडं विचित्र वाटतं ना. (Bidi Gharkul of Solapur, where Bidi is made in every household)

की प्रत्येक घरात हाच व्यवसाय कसा? आणि ते गाव कोणतं? तर यामध्ये आज आपण याच गावाचा शोध घेणार आहोत. सोलापूर हे सोलापुरी चादर साठी प्रसिद्ध आहेच,पण तिथल्या बिडी उद्योगासाठी सुद्धा चांगलंच प्रसिद्ध आहे. सोलापूरात बीडी घरकुल नावाचा परिसर आहे.

जिथे जवळपास प्रत्येक घरात महिला स्वतःच्या हातानी बीडी बनवतात, आता पासूनच नाही तर गेल्या २०, २५ वर्षा पासून हा त्यांचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायापासूनच त्यांचं घर चालत.

बिडी कारखान्यांकडून या महिलांना बिडी बनवण्यासाठी साहित्य मिळत, त्या साहित्यात महिला दिवसाला १००० बिडी बनवतात. पण हे ऐकून तुम्हला नक्कीच आश्चर्य वाटेल की त्यांना रोजच्या ८ ते १० तासांच्या कामानंतर दिवसाचे १५० रुपये मिळतात.

त्या हिशोबानी महिन्याचे ३५०० ते ४००० हजार त्यांना मिळतात. या आधी तर त्यांना दिवसाचे १०० रुपये मिळायचे पण महिलांनी यासाठी मोर्चा केल्यानंरत ती रक्कम वाढवून १५० करण्यात आली.

आता काहीही म्हटलं तरी ,कला ही कला असते.. बिडी बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक आहे. आणि या महिला ती अतिशय सुंदर रित्या पार ही पडतात.

बिडी बनवायसाठी जे पान मिळत ज्याला तेंदूपत्ता असं म्हटल्या जाते. त्याला भिजवून मापाने कापून मग तो तेंदूपत्ता हलक्या हाताने दुमडून त्यात तंबाखू भरतात आणि पान न तोडता धाग्याने बांधतात.

अश्या २५ बिड्यांचा एक बंडल बनवतात. आणि ते संध्याकाळी कंपनीला परत पाठवतात. आता पैश्यांच म्हटलं तर आधी पैसे आठवड्याला कॅश मध्ये मिळायचे.

पण आता रोजचा हिशोब ठेवून दर महिन्याच्या शेवटी बिडी कंपनी पैसे महिलांच्या खात्यात जमा करतात. पण काम म्हटलं किंवा व्यवसाय म्हटलं तर समस्या येतातच, इतकं काम करूनही दिवसाला फक्त १५० रुपये हाती येतात.

कंपनी त्यांना तेंदुपत्ती तंबाखू आणि दोरा देते त्यातल्यात्यात कारखान्यातून जितकं सामान पठवंल त्यात दिवसाचं टारगेट पूर्ण करायचं असते. मग बिडी बनवण्यासाठी तंबाखू किंवा तेंदूपत्ता जे कंपनी कडून पाठवतात ते कमी पडत असेल.

किंवा ते पान खराब आले तर ते त्या महिलांना स्वतःच्या पैश्यांनी विकत घेऊन टारगेट पूर्ण करावं लागत. महिलांच्या सांगण्यानुसार प्रत्येक वेळेला पान हे कमी पडतात.

त्या विकत घेतातच म्हणजे महिन्याचे पैसे ३५०० ते ४००० आणि त्यातही टारगेट पूर्ण करायसाठी स्वतःहून खर्च करावा लागतो. एकंदरीत बघायला गेलं तर महिना भर इतके कष्ट करून त्यानं जे मिळायला हवं ते मिळत नाही.

पण सोलापुरातील वस्त्रोद्योग आणि बीडी बनविण्याच्या उद्योगांमुळे कमी पगाराचा का होईना पण येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळतो तेही तीतकेचं खरे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button