ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

वाहतुकीचे २०२२ मधले नवे नियम माहीत आहेत का?

वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा रहावा म्हणून वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहेत. कालपरत्वे या नियमांमध्ये सुधारणाही करावी लागते.

तशीच सुधारणा होऊन नुकतेच सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. या लेखातून वाहतुकीच्या नवीन नियमांबद्दल आपण जाणून घेऊया.

काय आहेत बदललेले नियम –

जून २०२२ मध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत.

◆ हेल्मेट बाबत नवीन नियम –

मोटारसायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घातलं मग आता काही काळजी नाही असं न म्हणता हेल्मेटची स्ट्रीप लावलेली असणं आवश्यक आहे. ते केलं नसेल तर नियम मोटार वाहन अधिनियम १९४ ड नुसार तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

त्याचबरोबर हेल्मेटही मान्यताप्राप्त म्हणजे बीआयएस मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर याच नियमानुसार तुम्हाला १००० रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा प्रकारे नियमाचे पालन न केल्यास याच नियमांतर्गत तुम्हाला २००० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

◆ जास्त वजन असेल तर –

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार तुमच्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त वजन भरलं असेल तर तुम्हाला २० हजार रु. इतका दंड होऊ शकतो.

शिवाय मर्यादेच्या बाहेर जितकं वजन जास्त असेल तितकं प्रति टन २००० हजार रुपये दंड देखील द्यावा लागेल. यापूर्वी देखील जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

◆ आपत्कालीन वाहनांना वाट दिली नाहीतर –

आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच इमर्जन्सीमध्ये जेव्हा रस्ता मोकळा करण्यासाठी ॲम्ब्युलन्ससारखी वाहनं हॉर्न वाजवत राहतात, तेव्हा या वाहनांना जाण्यासाठी बाकी वाहनांनी रस्ता रिकामा करून द्यायला हवा.

अग्निशमन दलाच्या गाड्या, अ‍ॅम्ब्युलन्स अशी वाहने आपत्कालीन वाहने समजली जातात. हा आता नियम बनला आहे. आपत्कालीन वाहनाला ओव्हरटेक करू दिलं नाही तर संबंधित वाहनचालकाकडून चलान कापले जाईल व दंड आकारणी करण्यात येईल.

◆ दंडाच्या रकमेत वाढ

स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय वेगवानपणे वाहने चालवून अन्य लोकांचा जीव धोक्यात घालणारे अनेकजण असतात.

जोरदारपणे वाहन चालवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल यापूर्वी नाममात्र दंडाची रक्कम भरायला लागत होती. परंतु आता या दंडाच्या रकमेत चांगलीच वाढ करण्यात आली आहे.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास दुचाकी चालकांना एक हजार रुपये दंड, तर चारचाकी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाईल.

अशा प्रकारचा गुन्हा तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

◆ विनापरवाना वाहन चालवत असाल तर –

नवीन नियमानुसार विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बेफिकीरपणे वाहन चालवल्यास दुचाकी, चार चाकी व्यतिरिक्त अन्य वाहनांच्या चालकांना चार हजार रुपये दंड आकारण्याबद्दलची तरतूद कायद्यानुसार करण्यात आली आहे.

वाहन चालवण्याचे नियम नागरिकांनी सुरक्षित रहावे यासाठी बनवलेलेअसतात. या नियमांचं दंडाच्या भीतीपेक्षाही जीवाच्या भीतीने पालन केलं जावं, असं मला वाटतं. कारण, आपला जीव अमुल्य आहे आणि कोणीतरी नेहमीच तुमची घरी वाट पहात असणार आहे, हे विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button