ताज्या बातम्याट्रेंडिंग
माधुरी दीक्षितच्या गाण्यावर ‘तो’ बेधुंद नाचला, या माणसाचे सर्वत्र होतेय कौतुक…
सध्या सर्वत्र लग्नाची धूम आहे. लग्नाच्या घरात उत्साहाचे वातावरण असणे तर निश्चितच आहे, लग्नाची खरेदी, यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, डान्स या सर्वांचा समावेश यात आलाच. सध्या लग्नातला असाच एक उत्साही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. (He danced wildly on Madhuri Dixit’s song, this man is being admired everywhere)
या व्हिडिओमध्ये एक माणूस अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. ‘सारे लाडको की ‘ या माधुरी दीक्षितच्या गाण्यावर हा माणूस बेधुंद नाचताना दिसतोय. हा माणूस नुसताच नाचत नसून, गाण्यावरच्या प्रत्येक वाक्यावर वेगवेगळ्या स्टेप्स करतांना दिसतोय.
त्याचा डान्स पाहून लग्नात उपस्थित मंडळी देखील टाळ्या वाजवत त्याची प्रशंसा करतांना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या निरनिराळ्या कमेंट्स येत आहे.
एक नेटकरी म्हणतोय, प्रत्येकाने अशाप्रकारे मनसोक्त डान्स करावा. सर्वात्र या व्यक्तीच्या डान्स चे कौतुक होत असून, या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.