ताज्या बातम्याट्रेंडिंग

गूगल पे, फोन पे, पेटीएम सारखे पेमेंट अप्लिकेशन वापरत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्याचं…

या डिजिटल युगात डिजिटल पेमेंट हे सगळ्यांच्याच आवडीचे झाले आहे .प्रत्येकाच्या फोन मध्ये ऑनलाईन पेमेंट ऍप असतातच, पण तुमच्या सोबत असं कधी झालय का कि तुम्हला ऑनलाईन पैसे येण्याऐवजी तुमच्याकडूनच पॆसे सेंड केले गेले. (If you use payment applications like Google Pay, Phone Pay, Paytm, be careful about this ‘thing’.)

आणि तुम्हला कळलच नाही आणि मग हळू हळू तुमचं बँक अकाउंट रिकामं होत गेलं. आपल्या मेहनतीची कमाई एका झटक्यात गायब झाली तर कस वाटेल..? कारण होतंय काय ना कोणत्याही गोष्टीची लोकप्रियता वाढली की फसवणूक होण्याची शक्यताही वाढते. आणि अश्याच फसवणूक दिवसेन दिवस वाढतच चालल्या आहेत.

त्यामुळेच जर तुम्ही युपीआय वापरत असाल, तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील . आम्ही तुम्हला काही टिप्स देणार आहोत ज्या टिप्स तुम्हाला फसवणुकीपासून वाचवतील आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यास देखील मदत करतील. तर तुम्ही स्मार्टफोन किंवा डिजटल पद्धतीने ऑनलाईन बँकिंग वापरत असाल तर पासवर्ड हा महत्वाचा असतो.

त्यासाठी कधीच निष्काळजी करू नका. कारण काय होत, आपण आपले खाते लॉग इन करायसाठी जास्त त्रास होऊ नये ,आणि पासवर्ड आपल्याला लक्षात राहावा, म्हणून सोपा पासवर्ड ठेवतो. म्हणजे जस आपल्या वाढदिवसाची तारीख किंवा कोणताही सोपा अंक…आणि असे पासवर्ड ठेवल्यानंतर सायबर घोटाळेबाजांना पासवर्ड जाणून घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.

म्हणून पासवर्ड नियमितपणे बदलण्याची सवय लावा. तुम्हाला ऑनलाइन फसवणूक टाळायची असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. तुमचा युपीआय पिन सुद्धा तुमच्या एटीएम पिन सारखाच आहे. तुम्ही युपीआय आधारित पेमेंट ऑप्सवर पिन टाकूनच व्यवहार अधिकृत करता. त्यामुळे युपीआय पिन सुरक्षित ठेवणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे.

त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नका आणि पिन टाकू नका. आजकाल लोकांना मेल आणि व्हाट्सअपवर विशेषत: सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला ‘गिफ्ट’ किंवा ‘कॅशबॅक’ प्राप्त करण्यासाठी तुमचा पिन आणि इतर तपशील देण्यास सांगतात. त्यामुळे अशा लिंक्सची काळजी घ्या आणि त्या उघडू नका.

मोबाईल ॲप्समुळे अनेक सेवा सोप्या होतात. फायनान्शिअल ॲप असो किंवा गेम्स ॲप, तुमच्या मोबाइल फोनवर अप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यापुर्वी योग्य पडताळणी करा. केवळ गूगल प्ले स्टोर, ॲप्पल ॲप्प स्टोर किंवा विंडोस ॲप्प स्टोर सारख्या प्ले स्टोअर्सवरून कोणतेही अॅप्स डाउनलोड करा. सोबतच वेबसाइट खरी आहे की खोटी याची खात्री असल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन पेमेंट करणे टाळा.

फक्त त्या वेबसाइट्स ज्यात युआरएल मध्ये “डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू” आणि डोमेन नावाच्या आधी “एचटीटीपीएस://” असेल, अशा वेबसाइटचाच वापर करा. आपल्या सर्वांना फसवे कॉल, ईमेल आणि मॅसेज येत असतात, जे आपली वैयक्तिक माहिती उघड करण्याकरीता फसवण्याचा प्रयत्न करतात.

फसवणूक करणारे कॉलर एखाद्या बँक किंवा वित्तीय संस्थेचे कर्मचारी म्हणून आपली ओळख सांगू शकतात आणि मोफत कॅशबॅक, लॉटरी इत्यादींचा हवाला देऊन ते तुमची आर्थिक माहिती विचारू शकतात. एकदा त्यांना तुमची बँक माहिती मिळाली की ते तुमच्या नकळत तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरू शकतात.

आता आपण नेहमी वायफाय कुठे मिळेल याच्या शोधात असतो पण या सार्वजनिक कनेक्शन म्हणजेच वायफाय वापरण्यावरुन तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आता ते कसे? तर हा फसवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करणार असाल, तर त्यासाठी सुरक्षित खाजगी इंटरनेट कनेक्शनच वापरा असे आम्ही तुम्हाला सांगू.

पेमेंट मिळवण्यासाठी कोणताही पिन टाकू नका. कोणत्याही युपीआय  ॲपमध्ये, पैसे मिळवण्यासाठी युजर्सला त्याचा किंवा तिचा पिन टाकण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा. फ्रॉडस्टर्स अनेक वेळा ग्राहकांची अनेक प्रकारे फसवणूक करण्याच्या योजना आखतात.

अनेक वेळा फ्रॉडस्टर्स तुमच्यावर नजर ठेवून असतात. त्यामुळे जात तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. अनेक वेळा चॅटिंग ऍप वॉट्सअपवर फसवणुकीच्या लिंक्स येतात यातही तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे चुकूनही अश्या लिंक्स ओपन करू नका. ताबडतोड नंबर ब्लॉक करून डीलीट करा. आणि सर्वात आवश्यक अनेक प्रकारचे पेमेंट ॲप वापरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button