ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘चेतक फेस्टिवल’ मध्ये आलेल्या ‘या’ अस्सल घोड्याची किंमत आहे करोडोंच्या घरात…

सारंगखेडा हे गाव तिथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. ‘शोले’ पासून ‘बाजीराव-मस्तानी’ पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा, आणि हा अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील घोडेबाजार आहे. (In ‘Chetak Festival’ this genuine horse is worth crores)

हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. यावर्षी तब्बल सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये १७०० घोडे दाखल झाले आहे. पण या संपूर्ण १७०० घोड्यांपैकी या घोड्यांच्या बाजारामध्ये फक्त आणि फक्त चर्चा मात्र शनाया आणि शेराचीच आहे. आता कुठल्या कारणामुळे या दोन घोड्यांची इतकी चर्चा होत आहे? आणि इतकं या दोघांमध्ये काय विशेष आहे? हेच जाणून घेऊयात.

सारंगखेडा हे महाराष्ट्र राज्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं एक गाव आहे. सारंगखेडा गाव येथील १८व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे.

दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरत असते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार भरत असतो. हा बाजार मोठं मोठ्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवतो आणि संपूर्ण भारतात प्रसिद्ध आणि नावाजलेला असेलेला हा घोडेबाजार दिवसाला तब्बल १५ कोटींची उलाढाल करतो.

सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये आतापर्यंत १७०० घोडे दाखल झाले असले तरी सध्या बाजारात चर्चा होत आहे ती म्हणजे फक्त शनाया आणि शेरा यांची. त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्वशौकीन लोक तिथे गर्दी करत आहेत. पंजाब येथून दाखल झालेल्या अवघ्या ३२ महिन्याच्या शनायाची डौलदार चाल, उंची, तिच्यातील शुभ लक्षणे आणि त्याच सोबत तिच्या किमतीची सर्वांनाच भुरळ पडली.

हा पांढरा शुभ्र नुकर जातीचा अश्व आहे. तिचे कान मारवाड आहेत त्यात तिची उंची तब्बल ७२ इंच इतकी आहे. ती देशातील सर्वात उंच घोडी असल्याचे देखील बोलले जाते. तिने बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते तिच्या किमतीमुळे. शनाया या घोडीसाठी मालकाने तब्बल दिड करोडाची किंमत ठेवली असून एका अश्व शौकीनाने तिच्यासाठी ७० लाखांची ऑफर दिली होती.

पण तिच्या मालकाने ती ऑफर नाकारली. तिच्या खानपानाची देखील अतिशय काळजी घेतली जाते. तिला चणे खाऊ घातल्या जाते व सोबतच १०, १२ लिटर दूध सुद्धा पाजले जाते. सीजन असल्यामुळे तिला सफरचंद सुद्धा खाऊ घालण्यात येते. जवळ जवळ पाच किलो सफरचंद ती दररोज खात असल्याचे तिच्या मालकाने सांगितले आहे. यासोबतच अन्य खुराक सुद्धा तिला दिल्या जातात.

प्रत्येक घोड्याची किमंत हि त्याच्या उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरत असते. घोडा जितका रुबाबदार असतो तितकी त्याची किमंत जास्त असते. सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये दाखल झालेल्या शेरा या घोड्याची किंमत तब्बल ५१ लाख इतकी आहे. आता तुम्हला प्रश्न पडला असेल कि याची किंमत इतकी का? तर १७०० घोड्यांपैकी सर्वात रुबाबदार घोडा हा शेरा आहे.

एखाद्या राजा प्रमाणे तो अतिशय रुबाबदार आहे. त्याची उंची तब्बल ६३ इंच इतकी आहे. त्याची चाल देखील रुबाबदार आहे. त्याची सेवा करण्यासाठी २४ तास ४ मजूर नेहमी असतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावरानी तूप, चणाडाळ, गहू आणि बाजरी त्याच सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो.

सारंगखेड्यातील घोडेबाजारामध्ये दाखल झालेले महागड्या घोड्यांची विक्री हे त्यांचे मालक करत नसतात. अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होत असतात. या घोड्यांच्या ब्लडलाईन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व प्रजनन साठी वापरले जातात. त्यातून या घोड्या मालकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असतो.

असे अश्वतज्ञ जयपाल सिंह रावल यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. १८ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या विश्व सौदंर्य स्पर्धांपासून सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये अधिक रंगत येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button