इंस्टाग्राम रिल्सला टक्कर देण्यासाठी येतंय जिओच शॉर्ट व्हिडीओ ॲप, हे असतील फीचर्स…
शॉर्ट विडिओ ऍप टिकटॉक ला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली पण भारतात टिकटॉक बंद झाल्या नंतर अनेक शॉर्ट व्हिडिओ ॲप भारतात लाँच करण्यात आल्या, त्यात सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ते इंस्टाग्रामच्या रिल्स आणि यु ट्यूबच्या शॉर्ट विडिओला. पण आता या रेस मध्ये आणखी एक कंपनी भाग घेणार आहे. (Jio’s small video app is coming to rival Instagram Reel, the features will be…)
ते म्हणजे जीओ, आता जीओ सुद्धा भारतात शॉर्ट व्हिडिओ ॲप लाँच करणार आहे. आता या ॲप ची काय विशेषता असणार? कुठली खास फीचर्स या ॲप मध्ये असतील? आणि याचा युजर्सला काय फायदा होईल? हेच आज आपण जाणून घेणार आहोत. शॉर्ट्स व्हिडीओजची धुमाकूळ अवघ्या जगात सुरु आहे. अश्यात जीओ हि कंपनी लोकांना आपल्याकडे आकर्षित करायला मागे कशी राहणार, म्हणूनच जीओने आपले शॉर्ट व्हिडिओ ॲप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्याचे नाव प्लॅटफॉर्म असे असेल या प्लॅटफॉर्म ॲपसाठी जिओने रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्हलँड आशिया सोबत पार्टनरशीप सुद्धा केली आहे. या ॲपद्वारे कंपनी क्रिएटिव्ह टॅलेंटला जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्लॅटफॉर्म ॲप पेज अल्गोरिदम वर काम करणार नाही तर याची ग्रोथ ऑर्गेनिक असेल. युजर्सच्या क्रिएटिव्हि कंटेन्ट आणि लोकप्रियतेच्या आधारावर त्याला सिल्वर, ब्लू आणि रेड अश्या ३ टिक मिळतील.
त्या सोबतच प्लॅटफॉर्म ॲपमध्ये मोनेटायझेशनचा ऑप्शन सुद्धा असेल. आता या मध्ये एक नवीन अशी गोष्ट जोडली गेली आहे ज्या मुळे तुम्ही क्रियेटर्स ला बुक करू शकणार आहात. म्हणजेच क्रिएटर्सच्या प्रोफाइल सोबत बुक नाउ बटन असेल, याद्वारे कोणत्याही क्रिएटरची बुकिंग होवू शकेल व चाहत्यांना त्यांच्या सोबत जोडता येईल. या ॲपसोबत जिओने फाउंडिंग मेंबर प्रोग्राम आणले आहे. या फाउंडिंग मेंबर द्वारे १०० फाउंडिंग मेंबरला इनवाइट ओन्लीच्या आधारावर ॲक्सेस मिळेल. आणि त्याच्या प्रोफाइल सोबत गोल्डेन टिक मिळेल.
हे मेंबर्सकरिता नवीन आर्टिस्ट किंवा क्रिएटरला इनवाइट करू शकतील. या ॲपमध्ये तुम्ही सिंगर, म्यूझिशियन, डान्सर, फॅशन डिझायर सारखे इनफ्लूएंसर जोडले जाल. जिओ प्लॅटफॉर्म्स लाँचिंगवरून जिओ प्लॅटफॉर्म्सचे सीईओ किरण थॉमस यांनी म्हटले की, जिओ प्लॅटफॉर्म्स वर आम्हाला मिशन डेटा, डिजिटल, आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजी चा वापर करायचा आहे. यात आमच्या ग्राहकांमध्ये नवीन समाधान आणि अनुभव तयार केले जावू शकेल.
आरआयएल समुहाच्या भागाच्या रुपात आम्ही टेलिकॉम, मीडिया, रिटेल, मॅन्यूफॅक्चरींग, आर्थिक सेवा, शिक्षण आणि आरोग्य सेवा सोबतच अनेक उद्योग व्हर्टिकलमध्ये यशस्वीपणे भारतीय स्तरावर प्लॅटफॉर्म आणि समाधान वितरित केले आहेत. आता नवीन वर्षात लॉन्च होणारी हि ॲप जीओ कडून लोकांसाठी एक गिफ्टच झालय, पण आता बघायचं हे आहे कि कॉम्पिटेशनच्या या काळात हे गिफ्ट आता लोकांना किती आवडत आणि किती नाही.