ताज्या बातम्यामाहितीपूर्ण
आरे कारशेड जागेचा वाद काय आहे?
मुंबईतील आरे येथे मेट्रो कारशेडच्या बांधकामावरून 2019 पासून वाद सुरू आहे. शिवसेनेची युवा शाखा सेना आणि त्यांचे नेते आदित्य ठाकरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचेल, असा युक्तिवाद आंदोलकांनी केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादीही न्यायालयात पोहोचले. बीएमसीने झाडे तोडण्यास मंजुरी दिल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर एका रात्रीत हजारो झाडे तोडण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. सर्वसामान्यांसोबतच अनेक कार्यकर्ते आणि बॉलीवूड स्टार्सही रस्त्यावर उतरले. लोकांनी ‘सेव्ह आरे’ मोहीम सुरू केली होती.
दररोज उपनगरी लोकल लाईनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रोचे जाळे शहरात उभारण्यात येत आहे. मेट्रो 3 चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्यानं लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवानं या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाला सामना करावा लागत आहे.
जर आरे कारशेड प्रकल्पाचा नकाशा काळजीपूर्वक पहिला तर लक्षात येईल कि अत्यंत लहान भागात कारशेड बनविली जाणार आहे . त्यामुळे पर्यावरणाचा नाश नाही होणार आहे. सगळे जंगल नष्ट होईल असा सूर जो तथाकथित पर्यावरण प्रेमींकडून आळवला जातोय तो अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे .मेट्रोच्या पर्यावरणीय फायद्याची कल्पना नसल्याने काही पर्यावरण वादी विरोध करीत आहेत. आरे मेट्रो कारशेड चा विरोध करणारे 4 प्रकारचे लोक आहेत.
1. ख्रिश्चन मिशनऱ्या, ज्यांना तिथे दफनभूमी साठी जागा हवी आहे
2. बिल्डर लॉबी
3. ढोंगी पर्यावरणवादी, बॉलीवूड स्टार्स जे कधीच public transport ने प्रवास करत नाही
4. वरच्या तिघांचे ऐकून, 500 रु रोजाने आंदोलन करणारे मूर्ख
राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आरेतील २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर्थिक परिणाम काय असेल ?
मेट्रो कारशेड आरेमधून कांजुरमार्गला हलवल्यानं पैसा, जागा आणि साधनसंपत्तीची बचत होते आहे असं पर्यावरणप्रेमी सांगतात. पण दुसरीकडे या निर्णयामुळे आर्थिक फटका बसेल.
आरे कारशेड रद्द झाल्यानं पाच हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. प्रकल्प पाच वर्ष रेंगाळणार आहे. मेट्रो आठ किलोमीटर वळवून आरेमध्ये पार्क केली जाईल, त्यासाठी रोजची ऑपरेशन कॉस्ट वाढणार. त्यासाठी आठ किलोमीटर मार्ग टाकावा लागेल. ती जागा दलदलीची आहे, तिथे प्रकल्पासाठी परवानग्या घेण्यात आणखी वर्षानुवर्ष जाणार.
कोस्टल रोडचं काय?
आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या उभारणीला आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. आदित्य यांच्या या भूमिकेचं आणि शिवसेनेच्या आरेविषयी धोरणाचं मुंबईच्या पर्यावरणप्रेमींनी स्वागतही केलं. पण आरेमध्ये वृक्षतोडीला विरोध करणारं हे सरकार कोस्टल रोडच्या बाबतीत घेत असलेली भूमिका मात्र विरोधाभासाची असल्याचं मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलं आहे.
कोस्टल रोड हा एक विध्वंसक प्रकल्प ठरतो आहे. हे माझं म्हणणं नाही, 2011 साली एमएसआरडीसीचा अहवाल आहे, की समुद्रात भराव टाकू नका, कारण त्यानं समुद्रातील पर्यावरणाचं, जीवसृष्टीचं नुकसान होईल.
किनारा नष्ट होण्यानं मुंबईवर येणारं संकट जंगल नष्ट झाल्यानं येणाऱ्या संकटांपेक्षाही मोठं असेल.
ठाकरे-फडणवीस यांच्यातील या लढाईत मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च दिवसोंदिवस वाढतोय. त्याचा फटका सामान्य करदाते आणि लोकलच्या गर्दीत जीव मुठीत धरूण बसणारे तसंच रोजच्या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांना बसतोय.
मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्याने मुंबई प्रदुषणामुळे दररोज होरपळत आहे.