ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘असा’ घेतला रतन टाटा यांनी फोर्ड ने केलेल्या अपमानाचा बदला…

भारतच नव्हे तर अगदी जगभरात रतन टाटा हे नाव प्रसिद्ध आहे. त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व हे सर्वांच्याच परिचयाचं आहे. देशातील मोठे उद्योगपती या ओळखीपेक्षाही त्यांच्या दातृत्वाच्या चर्चा जास्त असतात. उद्योग जगतात उचांक गाठणाऱ्या या नावाला म्हणजेच रतन टाटा यांना एकेकाळी अपमानाला सामोरे जावं लागलं होत. (ratan-tata-took-revenge-for-fords-insult)

या अपमानाचा बदला त्यांनी आपल्या शब्दांनी नव्हे तर आपल्या कामगिरीने दिला. हा किस्सा सर्वत्र प्रचलित आहे. मात्र नेमका त्यांचा अपमान कोणी व का केला? आणि त्यांनी या अपमानाची परतफेड कशी केली? यामागे देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ज्यातून आजच्या पिढीला बरेच काही शिकायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात ही स्टोरी काय आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी इंटरप्रायजेस चे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून रतन टाटांनी फोर्ड कंपनीनं केलेल्या अपमानाची परतफेड कशी केली याची कहाणी शेअर केली.

१९९८ साली रतन टाटा यांनी नवा व्यवसाय सुरु करायचे ठरवले व प्रवासी कारच्या व्यवसायामध्ये ते उतरले. हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी याची पूर्व तयारी केली होतीच. टाटांनी १९९८ सालीच आपली पहिली वहिली प्रवासी कार लॉन्च केली. मात्र टाटा इंडिका या कारमुळे कंपनीला हवा तो नफा मिळवता आला नाही.यामुळे अनेकांनी टाटांना सल्ला दिला कि त्यांनी हा व्यवसाय बंद करावा.

हा व्यवसाय बंद करण्यासाठी त्यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला, ज्याचा प्रस्ताव त्यांनी फोर्ड कंपनीला पाठवला. फोर्ड कंपनीने देखील यात आपला रस दाखवला. याबद्दल चर्चा करण्याकरिता स्वतः रतन टाटा आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत डेट्रोइडला जिथे फोर्डचं मुख्यालय आहे तिथे पोहोचले.

ही चर्चा तब्बल ३ तास चालली, या दरम्यानच आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे टाटांच्या लक्षात आले. बिल फोर्ड टाटांचा अपमान करत म्हणाले, ‘तुम्हाला जर प्रवासी कारच्या व्यवसायाबद्दल काही माहित नव्हते तर, तुम्ही या व्यवसायामध्ये आलातच का? ही कंपनी विकत घेतली, तर मी तुमच्यावर एक प्रकारे उपकारच करेन.’

हे ऐकताच रतन टाटा यांनी डील रद्द केली आणि ते भारतात परतले, प्रवासादरम्यान त्यांनी या अपमानाचा खूप विचार केला. आणि तेव्हाच त्यांनी हा व्यवसाय बंद न करण्याचा निर्णय घेतला. रतन टाटा यांनी संपूर्ण लक्ष टाटा मोटर्सकडे वळवले आणि पुढील काळात या व्यवसायाने भरभरून प्रगती केली.

नऊ वर्षात टाटा मोटर्सने आपले नाव जगभरात गाजवले. २००८ साला पर्यंत संपूर्ण परिस्थिती पालटली. टाटा मोटर्सने यशाचे शिखर गाठले होते तर दुसरीकडे फोर्ड कंपनीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. अखेर तोटयात असलेल्या फोर्ड कंपनीला आधार द्यायचा निर्णय रतन टाटा यांनी घेतला व यातूनच जणू त्यांनी आपल्यासोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीचा देखील बदला किंवा परतफेड केल्याचे सांगण्यात येते.

फोर्ड कंपनी जेव्हा तोट्यात होती व कंपनीवर खूप कर्ज होते तेव्हा टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीचे लक्झरी ब्रँड जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याचा प्रस्ताव फोर्डला दिला. फोर्डने देखील हा प्रस्ताव लगेच स्वीकारला आणि हे डील करण्यासाठी ते स्वतः टाटा च्या मुख्यालयात म्हणजेच बॉंबे हाऊस येथे पोहोचले.

तब्बल ९३०० कोटी रुपयांमध्ये हा करार झाला. या करारा दरम्यान बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले, तुम्ही जग्वार आणि लँड रोवर विकत घेऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. हे तेच बिल फोर्ड होते ज्यांनी रतन टाटा यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. रतन टाटांनी अगदी काहीही न बोलतो जशाच तसे उत्तर बिल फोर्ड यांना मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button