ताज्या बातम्याट्रेंडिंग

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धेचे काही चित्र- विचित्र किस्से…

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते आणि त्यांचा जोतिष्य बुवा बाबांवर विश्वास, असे अनेक किस्से प्रचलित आहेत. आता महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदेंचं घ्या ना, ते सुद्धा जोतिष्याला भेटायला गेले होते आणि नंतर काय, तर.. महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. (Some Pictures of Superstitions of Political Leaders in Maharashtra – Weird Tales)

पण हे पहिलेच अशे राजकारणी नाहीत ज्यांनी असं काही केलय. या आधीही असे अनेक राजकारणी नेते आहेत जे भविष्यवाणी ऐकून, किंवा एखाद्या बाबांच्या म्हणण्यानुसार आपले निर्णय घ्यायच आणि आता ही घेतात. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर, यामध्ये आज आपण ते नेते कोण आहेत?, सोबतच अशाच राजकारण्यांच्या चित्रविचित्र अंधश्रद्धांचे काही किस्से जाणून घेणार आहोत….

आता पहिला किस्सा मी सांगणार आहे तो कुठल्या नेत्याचा नाही तर विधिमंडळाच्या इमारतीचा आहे. राजस्थान विधानसभेतील आमदार किर्ती कुमारी आणि कल्याण सिंह यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर, २०१८ मध्ये भाजपच्या आमदारांनी मागणी केली होती की, विधिमंडळाचे शुद्धीकरण करावे.

कारण ती इमारत स्मशानावर उभी आहे, आणि तिथे भुताखेतांचा वास आहे. शुद्धीकरण केल्यानंतर असे आकस्मिक मृत्यू होणार नाहीत. होम हवन करून शुद्धीकरण केलं आणि यथायोग्य दानधर्म केलं तर भुतं आणि आत्मे पळून जातील असं या आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी विधिमंडळाच्या सचिवांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.

दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्राचे आताचे डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस यांचा मिरची हवन सुद्धा चर्चेचा विषय बनला होता.सत्तेत येण्यासाठी त्यांनी मिरची हवन केले होते. आणि त्यानंतर फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता.

मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते.

असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या “चेकमेट- हाऊ बीजेपी विन अँड लॉस्ट” या पुस्तकात म्हटलं होतं. ज्योतिषांबद्दल बोललं की सगळ्यात आधी नाव येत ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं, यांनी अनेक निर्णय असे घेतले आहेत.

ज्यावर जोतिष्यशाश्त्राचा प्रभाव असतो,अश्या टीका विरोधक नेहमी त्यांच्यावर करत असतात. याच उदाहरण सांगायचं झालं तर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असता, शपथ विधीच्या वेळी जोतिष्याच्या सांगण्यावरुन शपथविधीच्या वळेवर शपथ न घेता ४ मिनिटं नंतर घेतली होती.

यावरही बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर चंद्रशेखर राव यांच्या कारचा क्रमांक हा ६६६६ असा आहे. त्यांच्या ताफ्यात याच क्रमांकाच्या अनेक गाड्या पाहायला मिळतात. त्यांच्या या हट्टापायी तेलंगणा सचिवालयाची चांगली इमारत असताना सुद्धा ते कोट्यवधी रुपये खर्चून वास्तूशास्त्राप्रमाणे नवीन इमारत बांधून घेत असल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती.

२०१६ साली मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्राचार्य महाराजांची रत्नागिरी येथे जाऊन भेट घेतली होती. नरेंद्राचार्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे. हे वाक्य आणि ही भेट वादग्रस्त ठरली होती.

नरेंद्र महाराजांचे नाव गैरव्यवहारात अडकलेले असताना त्यांना मुख्यमंत्री कसे भेटले, अशा महाराजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणे याचा खेद वाटतो, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या होत्या. आता हवेतून लाडू-पेढेच काय पण सोन्याचे नेकलेस काढून आपल्या भक्तांना दिल्यामुळे सत्य साईबाबांचा ही भक्त परिवार मोठा आहे.

अशोक चव्हाण हे देखील सत्यसाईबाबांचे भक्त आहेत. २००९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर, म्हणजेच शासकीय निवासस्थानी सत्य साईबाबा आले होते. सत्य साईबाबांच्या भक्त मंडळीत विलासराव देशमुख, जयंत पाटील, डी. वाय पाटील यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

विलासराव देशमुख हे सत्य साईबाबांचे भक्त होते आणि त्यांनी आपल्या घरी सत्य साईबाबांचे आदरातिथ्य केले होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते नरेंद्र दाभोलकर यांनी पुरस्कार नाकारला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button