ताज्या बातम्याट्रेंडिंग

छोटे कपडे घातल्यामुळे उर्फी जावेदला पोलिसांनी केली अटक, हे नेमकं प्रकरण काय…

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि चित्रविचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून जसे कधी वायर, मोबाईल, सिम कार्ड, दगड अशा कोणत्याही वस्तूंचा वापर करून बनवलेले कपडे उर्फी नेहमी परिधान करत असते. (Urfi Javed was arrested by the police for wearing short clothes, what is the actual case)

पण यावेळी मात्र, तिला हे विचित्र कपडे परिधान करणं चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय. तिचे हेच बोल्ड कपडे घालणे तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. तिच्या याच बोल्ड कपड्यांमुळे उर्फी जावेद ला पोलिसांनी चक्क ताब्यात घेतलं आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि उर्फी जावेद तर नेहमीच अशे बोल्ड कपडे घालून फिरत असते मग आता तिला पोलिसांनी ताब्यात का घेतलं. तर हे नेमकं प्रकरण काय आहे यामध्ये जाणून घेऊयात.

उर्फी जावेद सध्या दुबई मध्ये तिच्या एका शूट साठी गेल्याच तुम्हाला तिच्या इंस्टाग्रामच्या पोस्ट वरून कळलं असेलच. जी उर्फी नेहमी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. त्याच बोल्ड कपड्यांमुळे तिला भारतामध्ये नाही, तर तिला दुबईतील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे प्राप्त झालेल्या माहितीनुसार समोर आलं आहे.

उर्फी जावेद इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी तिने स्वतः तयार केलेले बोल्ड कपडे जी ती नेहमीच घालत असते त्याच प्रकारचा एक ड्रेस घालून तीने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल सुद्धा करण्यात आला. तिने ज्या जागेवर हे कपडे घालून शूट केले होते, त्या जागेवर तशे कपडे घालण्याची परवानगी नव्हती.

त्यामुळे दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलीस उर्फी जावेदची चौकशी करत असून तिच्यावर पुढे काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे आहे. कदाचित तिला भारतामध्ये परत येण्याकरिता वेळ सुद्धा लागू शकतो. दुबईत असतांनाच उर्फीने एक व्हॅट्सऍप स्क्रिनशॉट शेअर करत सांगितलं होत.

की एक व्यक्ती तिला वारंवार जिवाने मारण्याची आणि रेप करण्याची धमकी देत आहे, हा व्यक्ती काही वर्षांपूर्वी तिचा ब्रोकर होता. मुंबई पोलिसांनी फार लवकरचं या आरोपीला पटनामधून ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर अनेक कलम देखील लावल्या आहे.

मात्र दुबईत अडकलेल्या उर्फी जावेदवर दुबई पोलीस कुठली कारवाई करणार हे आता वेळ आल्यावरच कळेल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button