उरी फेम अभिनेत्री रिवा अरोराचे वय १२ मात्र दिसते २२ वर्षांची, नेटकरी करत आहे ट्रोल…
आजकाल तुमच्या निदर्शनास आलं असेल, तर किशोरवयीन मुलं सुद्धा अगदी तरुण दिसतात. कुठे न कुठे याला सोशल मीडियाची झगमगती दुनिया कारणीभूत आहे, यात काही दुमत नाही. (Uri fame actress Riva Arora’s age is 12 but looks 22 years old, netizens are trolling)
सर्वांना आपण किती सुंदर आहोत, आपली दिनचर्या काय अगदी छोट्यातून छोट्या गोष्टी लोकांना सांगायच्या असतात. यामागे आताच्या पिढीचा एकमात्र उद्देश असतो, ते म्हणजे आपल्या फॉलोवर्सची संख्या वाढवणं. आता ही पिढी त्यासाठी अगदी काहीही करायला तयार असते. आजच्या किशोरवयीन कलाकारांचं पण अगदी तसच झालय, त्यांना काय. तर फक्त फेम हवा असतो.
आता यात एका नावाची चर्चा सतत ऐकायला येत आहे ते नाव आहे उरी फेम अभिनेत्री रिवा अरोडा हीच. या नावाची चर्चा इतकी का होत आहे? तिच्या आई वडिलांवर सतत आरोप का होत आहेत? हेच जाणून घेऊयात या माध्यमातून. अभिनेत्री रिवा अरोडा या नावाची चर्चा सुरु झाली, जेव्हा तिचा बिग बॉस फेम करण कुंद्रा बरोबर एका रोमँटिक गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा.
उरी या चित्रपटात असतांना तिचे वय १० वर्षे होते, त्यानुसार विचार केल्यास आता तिचे वय १२ असायला हवेत. मात्र तीचे फोटोज, व्हिडीओज किंवा इंस्टाप्रोफाईल बघितल्यास असे मुळात वाटणार नाही की रिवा १२ वर्षांची आहे. आणि इथूनच नेटकऱ्यांनी आरोप- प्रत्यारोपांना सुरुवात केली.
इतके छोटे वय असून देखील ती इतकी मोठी कशी दिसत आहे, या प्रश्नापासून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
रिवा अरोडाने ६ महिन्यांची असतांना रणबीर कपूरच्या रॉकस्टार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यांनतर १० वर्षाची असतांना तिने उरी चित्रपटात काम केले आणि इथूनच तिला खरी ओळख मिळाली.
त्यांनतर तिने गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, सेक्शन ३७५, मॉम सारख्या चित्रपटांमध्ये तर बंदिश बंडिट्स सारख्या गाजलेल्या वेब सिरीझममध्ये काम केलं. २०२० साली रिवा ने तिच्या युट्युब करिअरची सुरुवात केली जिथे सध्या तिचे ९ लाखांपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत तर इंस्टग्राम वर ९. ४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
इतकच नाही तर ती जाहिराती आणि मोडेलिंग सुद्धा करते. इतक्या कमी वयातच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. परंतु तिच्या ट्रान्सफॉर्मेशन वरून लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर ती कायम बोल्ड स्वरूपातच पाहायला मिळते.
यासंदर्भातच तिच्या आई- वडिलांवर देखील आरोप लावले जात आहेत. बोल्ड फॅशन आणि इतक्या छोट्या वयात ऑनस्क्रीन सेक्शुअल आणि रोमँटिक पात्र आई वडील तरी कसे करू देतात, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. व केवळ पैशांसाठी तिचे आई वडील हे सगळं करत आहेत असे आरोप देखील लावण्यात येत आहे.
स्टिरॉईड्स द्वारे आणि सर्जरी दवारे रिवाचे वय वाढविण्यात आले असे देखील बोलले जात आहे. आता हे केवळ नेटकरी म्हणत नाही आहेत. तुम्ही जरी या बाल अभिनेत्रीची प्रोफाइल बघितली तरी तुम्हाला देखील असेच वाटेल. कारण केवळ १२ वर्षाच्या वयात इतकं मोठं दिसणं हे अशक्यच आहे.
३८ वर्षांचा अभिनेता करण कुंद्रा सोबतच्या रोमँटिक व्हिडीओ ने ट्रोल झाल्यानंतर देखील तिच्या अशाच रोमँटिक आणि सेक्शुअल व्हिडीओजची मालिका अजून सुरूच आहे. आता या गाण्यांच्या मेकर्स ला या बाल अभिनेत्रीचे वय कसे लक्षात येत नाही हा देखील एक सवालच आहे.
आता हे ट्रोल्स देखील या कलाकारांना लाईम लाईट मध्ये आणण्याचेच काम करते हेही तितकेच खरे आणि यामुळे यांच्या फॉलोविंग्समध्ये सुद्धा वाढ होते. पण कितीही याकडे दुर्लक्ष करायला गेलं तरी देखील आजच्या पिढीसाठी हा एक गंभीर प्रश्न आहे.