इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

संवाद कौशल्य सुधारण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स…

“न बोलणाऱ्याचे गहू तसेच राहतात, पण बोलणाऱ्याचा कोंडा ही विकला जातो.” अशी म्हण आपण ऐकली असेल. म्हणजेचं संवाद कौशल्य सगळ्यात महत्त्वाच आहे.

म्हणून आपल्यालाही वाटतं का की आपलं संवाद कौशल्य सुधारलं पाहिजे तर हा लेख वाचा. यामध्ये दिलेल्या आहेत संवाद कौशल्य सुधारण्यासाठी काही टिप्स…

व्हा उत्तम श्रोता:

चांगल्या पद्धतीने संवाद करता येण्यासाठी, आपल्याला प्रथम चांगले ऐकावे लागेल. संवाद नीट लक्ष देऊन ऐकला तर प्रत्येक महत्त्वाचा तपशील मिळतो आणि आपण अजून चांगला संवाद कसा साधता येईल याकरता सुधारणा सुद्धा करु शकतो.

थोडक्यात आणि मुद्द्याचं बोला:

जेव्हा अनावश्यक माहिती बोलण्यात येत असेल तेव्हा बहुतेक वेळेस संवाद योग्य प्रकारे घडत नाहीत. आपल्या संभाषणादरम्यान महत्त्वाच्या मुद्यांना बगल न देता संक्षिप्तपणे आपले म्हणणे मांडावे.

हे मौखिक संभाषणच नव्हे तर लिखित संभाषण करतानाही लागू होते. संवादाचा प्रकार कोणताही असू दे लेखी अथवा मौखिक; संभाषणासाठी जे महत्त्वाचे आहे तेच बोलण्याचा सराव करा.

आपला श्रोता ओळखा:

आपण कोणाशी संवाद साधत आहात हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि ते कोणत्या प्रकारे केलेले संभाषण समजणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदा. जर तुम्ही एखाद्या सहकाऱ्याशी किंवा वरिष्ठांशी संवाद साधत असाल,

तर उघडपणे अनौपचारिक भाषा वापरली जाऊ नये. तसेच, तुम्ही शॉर्टफॉर्म असलेले शब्द वापरल्यास, समोरच्या व्यक्तीला लगेच समजेल असे आपण गृहीत धरू शकत नाही. तर, आपलं बोलणं ऐकणारा कोण आहे, हे नीट पहा.

आवाजाच्या चढ-उतारांकडे लक्ष दया:

बहुतेक वेळेस कोणीच जर का योग्य स्वरात बोलत नसतो त्यावेळेस गैरप्रकारे संवाद घडतात. खूप मोठ्याने बोलू नये. खूप सौम्यही होऊ नका आणि उद्धट किंवा उर्मटपणे तर नाहीच. सर्वांशी नेहमी नम्रपणे आणि आदराने संवाद साधायला हवा.

सकारात्मकतेने संवाद साधा:

आपण आपल्या संवादासाठी वापरत असलेल्या भाषेत जास्तीत जास्त वेळेस होकारार्थी वाक्ये असणं आवश्यक आहे. उदा. तो हे काम नक्की करेल.

भाषेचं स्वरूप श्रोत्याचं किंवा वाचकाचं लक्ष त्वरित वेधून घेतं. ते तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतात आणि अपेक्षित असणारा संदेश त्यांना मिळतो.

देहबोली योग्य ठेवा:

देहबोली हा शब्दांशिवाय संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे त्याचा खोलवर प्रभाव पडतो. जेव्हा आपण व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये किंवा समोरासमोर भेटत असतो तेव्हा,

एक सकारात्मक देहबोली ठेवावी जसे की मोकळेपणा आणि डोळयांत डोळे घालून पाहणे. ही देहबोली पाहून समोरचा व्यक्तीही बदलून जाईल आणि त्याची देहबोलीही सकारात्मक होईल.

थेट बोला:

आपल्याला ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे त्याच्याशी जाऊन थेट बोला. बर्‍याच संस्थांमध्ये, संदेश पाठवण्यासाठी याच्या त्याच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात.

कानगोष्टी सारख्या खेळाचा अनुभव असेल तर निरोप इकडून तिकडे जाताना काहीतरी भलताच दिला जातो म्हणून जेव्हा बरेच लोक असतात तेव्हा हे कानगोष्टी सारखा प्रकार नकोच. आपण संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधायाला हवा.

संवाद ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. आणि नेहमी लक्षात ठेवा की सर्वात यशस्वी आणि आनंदी लोक जे आहेत, त्यांना उत्तम संवाद साधता येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button