ताज्या बातम्याट्रेंडिंग

ऑपरेशन वेळी डॉक्टर्स हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात?

तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असाल तेव्हा तुम्हाला डॉक्टर् आणि नर्स कायम पांढऱ्या कोटमध्ये दिसले असतील, पण तुम्ही चित्रपटात किंवा एखाद्या हॉस्पीटलमध्ये बघितलं असेल, जेव्हा ऑपरेशन करायची वेळ येते तेव्हा ओटी मध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात. (Why do doctors wear green or blue clothes during operation?)

एवढच नाही तर तुम्ही जर हॉस्पीटलमध्ये कधी बारकाईने बघितलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल की हॉस्पिटलच्या पडद्यांनाही हिरवा किंवा निळा रंग असतो. त्यासोबतच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असता. अश्यात प्रश्न पडतो कि हिरव्या आणि निळ्या रंगात असं काय खास असत, जे इतर रंगामध्ये नसत.

कपडे तर कुठल्याही रंगाचे घालता येतील पण फक्त या दोनच रंगाचे कपडे का घातले जातात. असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर आज आपण याच विशिष्ट रंगाच्या कपड्यांबाबत जाणून घेणार आहोत. ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात कारण सतत रक्त आणि मानवी शरीराच्या आतील अंग बघून ते मानसिक दबावात येऊ शकतात.

हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो. शस्त्रकिया करताना बारकाईने लक्ष असणं गरजेचं असतं. ऑपरेशन दरम्यान डोळे उघडे ठेवावे लागतात, ज्यामुळे डोळे थकतात, जर हिरवा रंग त्वरित दिसला तर डोळे थंड होतात. हिरवा रंग बघून तणाव दूर होतो. तर दुसरीकडे रुग्णाला निळ्या रंगाचा पोशाख दिला जातो.

कारण रक्ताचा लाल रंग अनेकदा हिरव्या रंगात दिसत नाही. ऑपरेशन करताना मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येतं. रक्ताचा लाल रंग निळ्यावर उठून दिसतो. परंतु त्याचा प्रभाव मात्र जाणवत नाही. निळ्यावर लाल रंग पाहिल्याच मेंदूला फारसं विचित्र वाटत नाही आपल्या मेंदूवर निळा रंगही हिरव्या रंगाप्रमाणेचं प्रभाव टाकतो. त्यामुळे रंग शास्त्राचा विचार करूनच ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे घालतात.

असे अनेकदा होते की, आपण जेव्हा एखाद्या रंगाकडे एकसारखे बघतो तेव्हा डोळ्यांना एक वेगळाच थकवा जाणवू लागतो. तसेच कोणत्याही चमकदार वस्तूला पाहून डोळे चमकतात. पण आपण लगेच जेव्हा हिरव्या रंगाकडे बघतो तेव्हा डोळ्यांना आराम मिळतो.

मुळात याच कारण हे कि, हिरवा आणि निळा रंग दृश्य प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लालच्या विरुद्ध आहे आणि एका ऑपरेशन दरम्यान एक सर्जन जवळपास नेहमीच केवळ लाला रंगावर लक्ष केंद्रित करत असतो किंवा त्यांना करावं लागत. इतकेच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर आपलया डोळ्यांची जैविक निर्मिती अशी झाली आहे कि, हे मुळात लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी सक्षम आहेत.

या तीन रंगाच्या मिश्रणातून तयार झालेले कोट्यवधी रंगाची ओळख मनुष्याचे डोळे पटवू शकतात. पण इतर रंगाच्या तुलनेत आपले डोळे हिरवा आणि निळा रंग अधिक चांगला बघू शकतात. याच कारणाने हॉस्पिटलमधील पडद्यानंपासून ते कर्मचाऱ्याचे कपडेही हिरव्या आणि निळ्या रंगाचे असतात. जेणेकरून हॉस्पिटलमधील रुग्णाच्या डोळ्यांना आराम मिळावा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button