ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

हे आहेत राहुल गांधींचे काही मजेदार किस्से…

राहुल गांधी या नावाला राजकारणाच्या दुनियेत एक वेगळी ओळख आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे नेते. गांधी घराण्याचं वलय असूनही त्यांचं एक खास वेगळं व्यक्तिमत्व आहे. सर्वच नेते जोरदार भाषणबाजी करून आश्वासने देऊन जनतेची मनं जिंकतात.

पण राहुल गांधी यांनी हसवून लोकांची मने जिंकली आहेत. आज १९ जून, राहुलजींचा वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांचे काही मज्जेदार किस्से आपण पाहूया.

राहुल यांच्या मते लोकसभेत ५४६ जागा आहेत –

२०१७ मध्ये काँग्रेस उपाध्यक्ष असताना राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. तिथे भाषणादरम्यान लोकसभेच्या एकूण जागांची संख्या किती हे त्यांना ऐनवेळी आठवलंच नाही आणि ते ५४६ जागा आहेत असे सांगून बसले.

आता अशा गोष्टींच्या बातम्या बनवण्यासाठी न्यूज चॅनल्स तयारच असतात, म्हणून ही त्यावेळची ठळक बातमी बनली होती. लोकसभा सदस्य असणारे राहुलजी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही:

सध्याच्या भारताची वाटचाल’ याविषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तिकडे गेले होते. हे करताना एकूण निवडून आलेल्या खासदारांची चुकीची माहिती दिली. कारण लोकसभेच्या जागा आहेत ५४५.

अम्मा कॅन्टीन की इंदिरा कॅन्टीन –

२०१७ मध्ये, राहुल गांधी बेंगळुरूमधील इंदिरा कॅन्टीनच्या उद्घाटनाला गेले होते, त्यावेळी राहुलजींनी कर्नाटकच्या स्वस्त अन्न उपक्रम ‘इंदिरा कॅन्टीन’चा उल्लेख ‘अम्मा’ कॅन्टीन’ असा केला, आता हे ‘अम्मा कॅन्टीन’ तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावे सुरु असलेला लोकप्रिय स्वस्त अन्न उपक्रम होता. म्हणून राहुलजी पुन्हा ठळक बातम्यांमध्ये झळकले.

राहुल झाले 3-इडियट्समधील चतुर –

मध्य प्रदेशातील महिलांच्या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपशासित राज्यात महिलांवरील वाढत्या हिंसाचाराचा उल्लेख करताना त्यांनी योग्य शब्दाऐवजी भलताच शब्द वापरला व ते बोलताना गोंधळून गेले.

राहुल यांनी शहडोल, मध्य प्रदेश मधील एका निवडणूक रॅलीत ‘बलात्कार या शब्दाच्या ऐवजी ‘भ्रष्टाचार’ म्हटले होते. हास्यकल्लोळ उडाला.

राहुल यांनी चुकीच्या व्यक्तीला मिठी मारली –

२०१६ मध्ये, राहुलजींनी गुजरातमधील उना येथील हॉस्पिटलमध्ये चुकीच्या व्यक्तीला मिठी मारल्यानंतर पुन्हा एकदा मजेशीर घटना घडली.

मेलेल्या गायीचे कातडे काढल्याबद्दल गावकऱ्यांच्या एका गटाने मारहाण केलेल्या तरुण दलित पुरुषांना भेटण्यासाठी उना गावात काँग्रेसच्या उपाध्यक्ष गेले होते.

त्यांनी स्थानिक रुग्णालयात एका महिलेला मिठी मारली. मात्र, ही महिला पीडितांपैकी कुणाचीही नातेवाईक नसल्याचे निष्पन्न झाले. राहुल गांधींनी मिठी मारलेल्या ५५ वर्षीय महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तिच्यावर केसेस दाखल आहेत.

मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह जॉब्स: राहुलजी –

“एक दिवस तुम्ही हा देश चालवणार आहात, संस्था चालवणार आहात, तुम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये स्टीव्ह जॉब्स आणि नेते व्हाल…

या देशाचे फेसबुक व्हाल,” २०१६ मध्ये मुंबईतील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असं बोलून राहुलजी पुन्हा चुकले. आता ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत.

“आज सकाळी मी रात्री उठलो”

२०१३ मध्ये काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाषण करताना राहुल यांनी आणखी एक घोळ घातला. सत्तेत असण्याबद्दलच्या मनात असलेल्या भीतीमुळे त्यांच्या आई सोनियाजींनी त्यांना मध्यरात्री १ वाजता कसे उठवले होते याचा संदर्भ देत गांधींनी ते जादूई शब्द उच्चारले, “आज सकाळी मी रात्री उठलो”.

गुजरात ब्रिटनपेक्षा मोठा आहे. तर भारत युरोप आणि अमेरिका यांपेक्षा मोठा आहे –

अहमदाबादमध्ये व्यावसायिकांशी संवाद साधत असताना, गुजरात हा युनायटेड किंगडमपेक्षा तर भारत हा युरोप आणि यूएसए एकत्र केले तरी त्यापेक्षा मोठा आहे असा दावा केल्यानंतर, राहुलजींच्या आयुष्यातील ही आणखी एक हास्यास्पद घटना ठरली.

खरंतर ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. एकटी अमेरिकाच आकारामानाने भारतापेक्षा तिप्पट मोठी आहे.

तर अशी विनोदी विधाने करून राहुलजी कायमच ठळक बातम्यांमध्ये झळकत असले तरी ते मनस्वी आहेत. ते वैयक्तिक जीवनाचा तितकाच आस्वाद घेताना दिसतात.

पक्षाच्या पडत्या काळातही ते सक्षमपणे उभे राहून काम करताना दिसतात. त्यांच्या सततच्या प्रयत्नातून ते आपल्या पक्षाला पुन्हा एकवार गतवैभव प्राप्त करून देतील अशी सदिच्छा आणि राहुलजींना त्यांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा!.!.!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button