ताज्या बातम्याट्रेंडिंग

येवले अमृततुल्य चहाच्या सर्वच प्रेमात, ‘असा’ उभा केला येवले बंधूंनी हा व्यवसाय…

चहा हा प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला आवडतोच आवडतो. कुठल्या न कुठल्या प्रसंगी चहा हा प्रत्येकाला हवा असतो. तुम्हीही जर चहाचे दिवाने असाल तर तुम्ही देखील नक्कीच म्हणत असाल. यार आता थोडी एनर्जी हवी चहा प्यावा लागेल. (Yevale amritulya tea everyone is in love,,This is how these two brothers set up this business)

चहा प्रेमींनी एक फेमस चहाच्या फ्रँचाइजी बद्दल नक्कीच ऐकलं असेल आणि तिथे चहा देखील प्यायले असतीलच. ही फ्रॅन्चायजी म्हणजे येवले अमृतुल्य. ऐकलं असेलच ना. आता नेमकी ही येवले अमृततुल्यची फ्रँचाइजी कुणाची आहे? आणि लोक इथल्या चहाच्या इतक्या प्रेमात पडले तरी कसे? हेच आज यामध्ये जाणून घेऊयात.

चहा बद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा एक चिनी राजा होता. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्यानी सांगितले होते की, पिण्याचे पाणी नेहमी उकळून प्यावे. ते शुद्ध आणि स्वच्छ असते. राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता.

आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालचाल विचारावी म्हणून त्याच्या काही नोकर आणि सैनिकांसोबत तो निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी तो थांबला असता. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली.

पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला जणू तरतरीच आली. आणि हाच जगातील पहिला चहा होता. तुम्ही पुण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही राहत असाल तर येवले अमृतुल्य हे नाव दिसतच. येवले बंधूंनी स्थापन केलेल्या येवले अमृततुल्यने २०१८ च्या सुरुवातीला सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

जेव्हा वृत्तपत्रांनी “हा पुणे चायवाला महिन्याला १२ लाख रुपये कसे कमावतो?” किंवा “येवले बंधूंना भेटा, जे चहा विकून महिन्याला १२ लाख रुपये कमवतात” यांसारखे शीर्षक देऊन बातम्या छापल्या होत्या. २०१७ मध्ये, येवले बंधूंनी भारती विद्यापीठाजवळ एका मित्राचा फूड जॉइंट उघडला होता.

उत्तम दर्जा, त्यांचे प्रेमळ स्वागत आणि विनम्र सेवा पुणेकरांना खूपच भावली, यामुळेच कमी वेळात ते घराघरात नावारूपास आले. येवले अमृतुल्य उभारण्यामागे सुद्धा येवले बंधूंचे एक स्वप्नच दडले होते. येवले बंधूंनी त्यांचे दिवंगत वडील श्री दशरथ भैरू येवले यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले.

तेव्हा त्यांना येवले अमृततुल्यची कल्पना सुचली. त्यांच्या कुटुंबाचा वारसा म्हणून, “गणेश अमृततुल्य” या चहाच्या स्टॉलचे मालक असलेले त्यांचे वडील, दोन मुख्य व्यवसाय तत्त्वे मागे सोडून गेलेत ते म्हणजे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा.अनेक संशोधने, प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर येवले बंधूंना येवले अमृततुल्यची कल्पना आली. आणि त्यांच्या वडिलांचा चहा हा व्यवसायच पुढे न्यायचे त्यांनी ठरवले.

तसा अमृततुल्य शब्दाचा अर्थ हा शब्दकोशामध्ये “अमृत” असा आहे. अमृत हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “अमरत्व” असा होतो. परंतु याचा अर्थ “अमृत” देखील असू शकतो. तुल्य म्हणजे “तुलनायोग्य”. परिणामी, अमृततुल्य म्हणजे “अमृताशी तुलना करता येण्याजोगे” म्हणजेच गोड, बहुतेक लोकांना त्यांचा चहा जसा आवडतो अगदी तसाच या शब्दांचा अर्थ होतो.

कारण काही चहाप्रेमींकडून तुम्ही ऐकलंच असेल की आमच्यासाठी चहा म्हणजे अमृतच आहे. येवले अमृततुल्यच्या देशभरात सुमारे २८० शाखा आहेत, त्यापैकी बहुतांश शाखा महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांच्या वाढत्या व्यवसायामुळे चहाची मागणी लवकर कमी होईल असे काही वाटत नाही.

तुम्हालाही एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर येवले अमृतुल्य चहाच्या फ्रँचाइजी मध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. शिवाय, हे कोणत्याही महानगरात उघडले जाऊ शकते. अगदी लहान शहरे किंवा खेड्यांमध्ये सुद्धा उघडले जाऊ शकते. आणि यात नफाही चांगला होतो. त्यामुळे हा व्यवसाय निवडने काही चुकीचे ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button