ताज्या बातम्याट्रेंडिंग

भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार कोरोनाचे ग्रहण? ‘हे’ निर्बंध पुन्हा लागू शकतात…

चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे, सर्व देशांप्रमाणे कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर इथेही निर्बंध शिथिल करण्यात आले होते, मात्र अचानक आता रुग्ण सांख्यमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. (Corona eclipse for Indian celebration? ‘These’ restrictions may apply again)

एक्स्पर्टसचा असा अंदाज आहे, की येणाऱ्या ९० दिवसात चीनमध्ये ६० टक्के तर पृथ्वीच्या १० टक्के लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे आणि यात लाखो लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. नवीन वर्षाची सुरुवात अगदी काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे, आता भारताला तर हे ग्रहण लागणार नाही ना? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

यामध्ये आपण जाणून घेऊयात की, पुन्हा भारतात कोरोना याच वेगाने पसरू शकेल का? प्रशासन याबाबत काय खबरदारी घेत आहे? आणि आता सरकार संसर्ग होऊ नये यासाठी नियमांमध्ये काय बदल करतील, कुठले निर्बंध लावले जातील?

चीन मध्ये वाढती रुग्णसंख्या आणि बिकट परिस्थिती पाहता, सरकार ऍक्शन मध्ये आलं आहे, बुधवारी केंद्रीय स्वास्थ्य मंत्री मनसुख मांडाविया यांनी एक मिटिंग घेतली ज्यात कोविड पुन्हा त्याच गतीने पसरला तर काय करावे यावर चर्चा झाली.

चीनमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची वार्ता येताच सगळे सतर्क झाले, मात्र चीन मधून असे अनेक भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे, जे आपल्याला २ वर्षा पूर्वीची आठवण करून देत आहेत आणि त्यामुळे लोक देखील घाबरले आहेत.

या व्हिडिओच्या माध्यमातून तिथल्या लोकांचं सांगणं आहे की, केवळ ५ रुग्ण नाही तर बऱ्याच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये किती सत्य आहे हे अजून स्पष्ट सांगता येणार नाही.

केवळ चीनच नाही तर इतरही बरेच देश आहेत, जिथनं रुग्ण संख्या वाढीची बातमी समोर येत आहे. मागील २४ तासात जपान मध्ये ७२ हजारांपेक्षा जास्त तर अमेरिकेत २२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याचि माहिती समोर आली आहे.

स्वास्थ्य मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर मनसुख मांडाविया यांनी ट्विट करत माहिती दिलीय की, कोविड अजून संपलेला नाही, त्यामुळे सर्वानी सतर्क राहावे, आम्ही कोणत्याही परिस्थितीला समोर जायला तयार आहोत.

तसेच मांडाव्या यांनी सर्वांना कोव्हीड वॅक्सीन इंजेक्शन लावून घेण्याची विनंती देखील केली. याव्यतिरिक्त सरकारने विदेशातून आलेल्या लोकांची विमानतळावरच सॅम्पलिंग टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर नीती आयोगाचे स्वास्थ्य सदस्य.. डॉक्टर विके पॉल म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी, किंवा घरातल्या आत आणि बाहेर मास्कचा वापर करा. त्यांनी वयस्कर लोकांना जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे देखील सांगितले.

ते म्हणाले की देशात केवळ २७ ते २८ टक्के लोक्कांनी प्रिकॉशन डोझ घेतला आहे. त्यामुळे सर्वानी प्रिकॉशन डोझ घेणे अनिवार्य आहे, विशेष म्हणजे वयस्कर नागरिकांनी.

आता भारत देखील ऍक्शन मोड मध्ये आला असून, टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आली आहे, आणि असे आदेश प्रत्येक राज्याच्या सरकारांना देण्यात आले आहे. ओमिक्रोन व्हेरिएंटचा सबव्हेरिएंट असणारा बी एम ७ चीनमध्ये पसरत आहे.

हा व्हेरिएंट भारतमध्ये असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता हा व्हेरिएंट ओळखायचा कसा तर इतर व्हेरिएंटप्रमाणेच याचे देखील लक्षणे आहेत.

याचं मुख्य लक्षण शरीराचे दुखणे असल्याचे बोलले जात आहे, यासोबतच सर्दी, कफ, थकवा जाणवल्यास डॉक्तरांकडे जाण्याचा सल्ला तज्ज्ञनी दिला आहे.

सध्या परिस्थिती पाहता लॉकडाऊन तर नाही मात्र सरकार निर्बंध तर पुन्हा लावू शकतेच. यात मास्क अनिवार्य असणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्टँडवर रँडम चाचणी, बूस्टर डोसची प्रक्रिया वाढवणे यांसारखे नियम असतील.

त्यामुळे घाबरून न जाता आजपासूनच मास्कचा वापर करा, स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button