ताज्या बातम्याट्रेंडिंग

तिच्या डान्सनं स्थूलतेवरही केली मात, या भन्नाट चंद्राचा व्हिडीओ एकदा नक्की पहा…

सोशल मीडिया वर दररोज डान्स चे व्हिडिओ शेअर होत असतात. सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे. जिथे लोक मनोरंजक व्हिडीओ पाहात असतात. (Her Dance Overcame Obesity, Watch This Awesome Moon Video)

या माध्यमातून तुम्ही पैसे देखील मिळवू शकता. त्यामुळे लोक प्रसिद्धीसाठी आणि पैसे कमावण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आपले वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. या महिलेनं चंद्राच्या गाण्यावर डान्स केला आहे. खरंतर हे गाणं सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यापैकी एक आहे.

या गाण्याने लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण आता या महिलेच्या गाण्याने देखील लोकांना वेड लागल्याचं पाहायला मिळत आहे.

खरंतर डान्स किंवा लावणी करणारी महिला म्हटलं की ती सडपातळ किंवा बारीक असावी असाच लोकांचा समज असतो. पण या महिलेनं सिद्ध केलंय कि वजनाचा डान्सशी काहीही संबंध नसतो.

तिने इतका सुंदर डान्स केलाय की तुम्हाला तो संपेपर्यंत पाहातच राहावासा वाटेल. या व्हिडीओला एक लाखापेक्षा ही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

हा व्हिडीओ स्नॅझी. तामिळाची या अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमधील महिलेचं दिव्या विक्रम हे नाव आहे. ती फॅशनब्लॉगर, डान्सर, कन्टेन्ट क्रिएटर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button