हॉटेल ७/१२ कमी वेळेत कसे झाले इतके प्रसिद्ध? सातासमुद्रापारही या हॉटेलचीच चर्चा…
कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव आणि त्यासोबत सोलापुरी काळया पिवळ्या मटणाचा आस्वाद सोबत चाखायला भेटणारं, प्रसिद्ध हॉटेल ७/१२ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालय. (How did Hotel 7/12 become so famous in such a short time? The talk of this hotel is far and wide)
महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे, खेड्यांची ओळख लहान मुलांना झाली पाहिजे, यासाठी एक अनोखी संकल्पना घेऊन बनवण्यात आलेलं हॉटेल ७/१२ महाराष्ट्रात क्वचितच लोक असेल ज्यांना या हॉटेल बद्दल माहिती नसणार.
फार कमी वेळात एका साध्या चहाच्या टपरी पासून सुरु केलेल्या या हॉटेलच्या, आता १० शाखा बनल्यात. पण इतक्या कमी वेळात हे हॉटेल एवढे प्रसिद्ध कसे काय झाले. हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.
तर कोल्हापूरजवळील गड मुडशिंगी गावाजवळ या हॉटेल ची सुरुवात झाली. हॉटेलचं नाव जसं वेगळं, तसंच इथलं वातावरण देखील वेगळं आहे.
शेणानं सारवलेली कंपाउंडची भिंत, आत नजरेस पडणारे टांगलेले कंदील, बाजूलाच एक बैलगाडी आणि विहीर हे सगळं पाहून तुम्हाला ग्रामीण भागातील वातावरणाचा आनंद घेता येतो.
हे हॉटेल सुरु केल्यानंतर याच्या हटके थीम आणि जेवणाची अवघ्या २, ३ महिन्यातच सर्वत्र चर्चा व्हायला लागली. राहुल सावंत म्हणजेच, ७/१२ हॉटेल चे मालक, त्यांना अभ्यासात जास्त रुची नव्हती.
म्हणून १० वी नापास झाल्यानंतर वडिलांच्या सांगण्या वरून काम करायला लागले. ज्यात हमाली, ड्राइविंग सारखे काम केल्या नंतर, त्यांना तहसीलदार ऑफिसला ७/१२ लिहायचे काम मिळाले.
४ ते ५ वर्ष काम केल्या नंतर तिथे मन रमल नाही, म्हणून दुसरी कडे प्रॉपर्टी एजेंट म्हणून काम सुरु केलं. त्यात हात बसायला लागला मग ते इन्व्हेस्टर झाले मग फायन्यांसर आणि मग बिल्डर पण २०१७- १८ मध्ये अचानक नोट बंदी झाली.
पूर्ण पैसा प्रॉपर्टी लाईन मध्ये ब्लॉक झाला. त्यानंतर कॅश लिकव्हीडीटी फार कमी होती म्हणून आता दुसर काही तरी करावं म्हणून एक्सीडेंटली या व्यवसायात ते आले. त्यांना लहानपणा पासून जेवण बनवण्याची आणि मित्रांना खाऊ घालायची आवड होती.
म्हणून त्यांनी हा व्यवसाय निवडला आणि ५०० स्क्वेयर फूट च्या छोट्या दुकान माळा मध्ये चहा विकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे १० प्रकारचे चहा मिळायचे. सर्दी साठी वेगळा, तापा साठी वेगळा आणि त्याचे मसाले त्यांच्या बायको या स्वतः बनवायच्या.
हळू हळू लोकांची गर्दी वाढू लागली. पण हा चहाचा व्यवसाय ४ ते ५ तसाच चालायचा. बाकी वेळही आपण या मध्ये काम करू शकतो. मग काही तरी वेगळं करायचं जे कोल्हापुरात नाही आहे.
म्हणून काय करायचं तर कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा खायला लोक लांबून येतात म्हणून त्याच्या हटके आपण लोकांसाठी सोलापुरी मसाल्यातलं काळ मटण चालू करायचं ठरवलं. मग चहाच्या स्टॉल वर मटण विकन सुरु केलं आणि ते लोकाना फार आवडलं.
गर्दी वाढायला लागली पण तांत्रिक अडचणींमुळे ते दुकान बंद झालं. हातात पैसे नव्हते ,पण हॉटेल तर सुरु करायचंच होत. अनेक अडचणी आल्या, लोंकानी तर चक्क या अफवा पसरवायला सुरुवात केली की या हॉटेल चे मालक एक्सपायर झालेत.
पण नंतर त्यांनी सगळ्या संकटांवर मात करून एक जागा घेतली आणि हॉटेल सुरु केलं त्यातल्या त्यात नशीबानी साथ दिली. लोकांची गर्दी वाढायला लागली, सावंत कन्स्ट्रक्शनच्या बिजनेसमध्ये असताना त्यांना महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक मध्ये खूप फिरणं व्हायचं.
सगळीकडे फिरतानां त्यांना घरच जेवण कुठेच मिळत नव्हतं आणि अश्या याच्यात लोकांना घरगुती जेवण मिळावं म्हणून ही कल्पना त्यांनी डोक्यात आणली आणि नैर्सगिक मसाल्यांपासून बनवलेलं घरच जेवण लोकांना अतिशय आवडले.
५०० स्क्वेअर फूट पार केलेला व्यवसाय ५००० स्क्वेअर फूट मध्ये आला तिथेही जागा कमी पडायला लागली मग २०००० हजार स्क्वेअर फूट आणि आता १ लाख स्क्वेअर फूट मध्ये हा प्रवास सुरु केला. याच्या महाराष्ट्र भरात १० शाखा आहेत.
त्यातल्या त्यात शेतकरी आणि जवानांना इथे २५ % डिस्काउंट ही मिळतं. हा व्यवसाय करताना त्यांना जीवे मारण्याचा ही प्रयत्न झाला, धमक्या आल्या पण त्यांनी हार मनाली नाही.
ते म्हणतात ना जे काम करायचं ते प्रामाणिक करायचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहायचं तर यश नक्की तुमच्या पायाशी येईल आणि असच ७/१२ हॉटेल सोबत झालं.