ताज्या बातम्याट्रेंडिंग

मराठमोळी सोलापुरी चादर जगभर प्रसिद्ध झाली तरी कशी?

तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या कोणत्याही घरात गेलं तर एक चादर सापडतेच सापडते ती म्हणजे सोलापुरी चादर. असं कदाचितच एखादं घर असेल जिथं ही चादर सापडणार नाही. (How Marathmoli Solapuri Chadar became famous all over the world?)

आपल्या महाराष्ट्राची ही सोलापुरी चादर केवळ भारतभरच नाही तर अगदी परदेशातही पोहोचली आहे. आता तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडला असेल की बाबा सोलापूरच्या चादरीत अशी काय खास बात आहे? आणि बाकी चादरीच्या तुलनेत हिच्यात असं काय वेगळं आहे? तर अगदी याच प्रश्नांची उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलॊ आहोत.

आता सोलापूरच्या चादरींचाही एक इतिहासचं आहे, जो आपण थोडक्यात जाणून घेऊयात.. तर सोलापूरच्या चादरी म्हंटल की “पुलगम” या कुटुंबाचा उल्लेख झाल्याशिवाय राहात नाही, आणि असही म्हणायला हरकत नाही की या कुटुंबाशिवाय सोलापूरच्या चादरीचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

मुळात पुलगम हे कुटुंब आंध्रप्रदेशचे. १९४० च्या दशकात ते सोलापूरला आले. इथे येऊन या कुटुंबाने हातमाग सुरु केले. कुटुंबापैकी यंबय्या माल्ल्या पुलगम यांचा पुलगम टेक्स्टाइलच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी स्वत:चे चार हातमाग १९४९ साली सुरू केले, आणि त्यांच्या साड्यांमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली.

आपले पहिले दुकान उघडून त्यांच्या साड्या ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने विकण्यास आरंभ केला. त्यांचे संपूर्ण बाजारपेठेत नाव झाले ते त्यांनी टिकून ठेवलेल्या गुणवत्तेमुळे. याच कुटुंबातील रामय्या सांबया पुलगम यांनी पुढे व्यवसाय वाढवला आणि पुलगम शोरुमची स्थापना केली. वर्ष पुढे सरकत गेले आणि त्यांचा व्यवसायही वाढत गेला.

त्यांच्या साड्यांचे इतके नाव झाले, की त्यांची इतर वस्त्रोत्पादनेही ज्याच्या त्याच्या तोंडी होऊन त्यांची अफाट विक्री झाली. पुलगम यांनी बाजारात आणलेल्या मयुरपंख बॅन्डला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या सितारा, रोशनी, राधिका आणि इतर ब्रॅन्डच्या चादरी, बेडशिट्स ,टॉवेल आणि इतर हातमाग वस्तूंना देशभरासोबत परदेशातूनही वाढती मागणी आहे.

सोलापूरच्या या जेकॉर्ड चादरी त्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विशेष करून त्यांच्या रंगसंगतीमुळे ओळखल्या जाऊ लागल्या. याच काळात क्षीरसागर, चिलका, चाटला, वडनाल, दत्तोबा दिवटे, कमटम अशा उद्योजकांनी साड्या पासून चादरीपर्यंत निर्मिती सुरु केली. आता केवळ पुलगमच नाही तर इतरही लोकांनी जेकॉर्ड चादरी बनविण्याची सुरुवात केली.

मात्र पुलगम कुटुंबाच्या नावानेच या सोलापुरी चादरांना खरी प्रसिद्धी मिळाली. या कुटुंबाला त्यांच्या गुणवत्तेकरिता आणि नवनवीन उत्पादनाकरिता इंडियन इकॉनॉमिक अँड रिसर्च असोसिएशन संस्थेतर्फे “उद्योग रत्न पुरस्काराने गौरविण्यात आल. मात्र आता दिवसेंदिवस या चादरीच्या व्यवसायात घाट पाहायला मिळत आहे.

पूर्वी ज्या चादरींचे दररोज डिड लाखांच्या घरात उत्पादन व्हायचे त्याच चादरींचे उत्पादन आज केवळ १० हजारांच्या घरात येऊन पोहोचले आहे. खरं तर सोलापुरी चादरीच्या नावावर ड्युप्लिकेट माल विकणाऱ्यांना याचा फटका बसला आहे. आजकाल फॅशनच्या नावाखाली लोक मऊसूत आणि डिझायनर ब्लॅंकेट्सचा वापर करतात.

मात्र खरी उब तर आजही सोलापुरी चादरींमध्येच अनुभवता येऊ शकते. पाहायला गेलं तर सध्या या व्यावसायिकांना शासकीय मदतीची गरज आहे, कारण सोलापुरी चादरींचा व्यवसाय आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

या गावातील व्यावसायिकांना मार्केट उपलब्ध करून देणे केवळ सरकारचीच जबाबदारी आहे. यामुळे महाराष्ट्राला अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या सोलापुरी चादरींचा व्यवसाय कदाचितच वाचू शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button