राम शिंदे यांनी मोठ्या नेत्याला गळ्याला लावले अन् रोहित पवार यांचं टेन्शन वाढवलं…
अहमदनगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना घेरण्याची रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येत असून त्यांना कोणत्याही क्षणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Ram Shinde increased the stress of Rohit Pawar by bringing the big leader closer…)
कारण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच घुलेंनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची भेट घेतली होती.भेट झाल्यानंतर यांनी कर्जतमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी आमदार पवार आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
आता घुले यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी आणि इतरही पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये खेचण्याचे सपाटाच लावला आहे. यापूर्वी विधानसभा आणि नगरपंचायती निवडणुकीत घुले यांनी रोहित पवारांना पाठींबा दिला होता.
तर सध्या घुलेंची भावजय कर्जत नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष आहे. त्यामुळे रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. प्रवीण घुले हे कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना त्यांनी चांगली साथ दिली. परंतु आता त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसतं.
राम शिंदे यांची विधान परिषदेवर झालेली निवड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तापरिवर्तन यामुळे या प्रक्रियेला वेग आला.आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रवीण घुले यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आपल्याला कर्जत नगरपंचायत निवडणूक स्वतंत्र लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने ते मान्य केलं नाही.
त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. मात्र यामुळे पक्षाचे नुकसान झालं. याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. रोहित पवार विश्वासात घेऊन काम करत नाहीत. तसंच योग्य तो मानसन्मान मिळत नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक असल्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे घुले यांनी म्हटलं.
कर्जत आणि जामखेड तालुक्यात घुले यांचा चांगलाच संपर्क आहे त्यातलयात्यात घुलेंचा भाजपात प्रवेश झाल्या वर मोठा राजनीतिक फेरा होण्याची शक्यता दिसत आहे तर आता हे बघणं महत्वाचं आहे कि घुलेंच्या पक्ष बदली मुळे भाजप आणि काँगेस मध्ये काय बदल होणार..