ट्रेंडिंगताज्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्याच्या हातचलाखीचा व्हिडीओ एकदा नक्कीच,५०० ची नोट २० रुपयात बदलली…

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सध्या अश्याच एका व्हिडिओत एका रेल्वे कर्मचाऱ्याची हातचलाखी समोर आल्याचे दिसून आले. (The video of the railway employee’s dexterity is definitely one time, 500 note changed to Rs.20… )

सध्याचे युग हे इंटरनेटचे झाले आहे. बऱ्याच गोष्टी आणि व्यवहार हे आता ऑनलाईन होतात. यामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग सुद्धा होत असते. असे असले तरी आज सुद्धा मोठ्या संख्येने लोक काउंटर वरूनच तिकीट खरेदी करत असतात.

अशा परिस्थितीत सुद्धा प्रवासी इतके घाईत असतात की, काही वेळा ते तिकीट काउंटरच्या व्यक्तीकडून सुट्टे पैसे घेण्याचे सुद्धा विसरत असतात. याचा फायदा काही लोक घेतात.

असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरील आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक प्रवासी सुपरफास्ट ग्वाल्हेर ट्रेनचे तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट काउंटरवर उभा असून त्याने रेल्वे कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची नोट दिली.

मात्र, या कर्मचाऱ्याने हातचलाखी करून ती ५०० रुपयांची नोट २० रुपयांच्या नोटेमध्ये बदलली. या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये कर्मचाऱ्याचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले असून सर्वत्र व्हायरल होत आहे.

हातचलाखीची ही घटना २२ नोव्हेंबर रोजी निजामुद्दीन स्टेशन बुकिंग ऑफिस येथील आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्विटर हँडल रेल व्हिस्परसं ने २५ नोव्हेंबर रोजी शेअर केला. रेल्वे कर्मचाऱ्याचे हे कृत्य कॅमेरात कैद होऊन जेव्हा व्हायरल झाला.

तेव्हा रेल्वे प्रशासनाने खळबळून जागे होत त्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. या व्हिडिओला अडीच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज, ४००० लाइक्स आणि २००० रिट्विट्स आले आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रिया देऊन कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button