ताज्या बातम्याट्रेंडिंग

भाजपात जाण्याची इच्छा, मात्र जयदत्त क्षीरसागर यांना कुणी पक्षातच घेईना…

२०२४ च्या निवडणुकी साठी बीड मध्ये एके काळी एक हाती सत्ता आणि नेतृत्व करणारे जयदत्त क्षीरसागर आता राजकारणात सक्रिय झालेय. पण, याना अजूनही भाजपात प्रवेश मिळत नाही हि परिस्थिती आहे. (There was a desire to join the BJP, but no one accepted Jaydutt Kshirsagar in the party…)

अनेक स्थानिक पातळीवरील भाजपा वरून जयदत्त क्षीरसागर याना विरोध होताना दिसतोय त्या मुळे चार वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री अशी पदे गंजीविणाऱ्या जयदत्त सक्षीरसागर यांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि कोणताच पक्ष त्यांना आपल्या पक्षात घ्यायला तैय्यर हि नाही असेही दिसून येतंय.

राजकीयदृष्टया भाजपमध्ये जाण्यासाठी जयदत्त क्षीरसागर उत्सुक असल्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाच स्पष्ट झाले होते. मात्र, शिवसेना- भाजप युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन बांधले. आता ज्या भाजपाच्या भरोश्यावर क्षीरसागरानी शिवसेनेला सोडले ,आता तेच यांना आयत्यावेळेवर पक्षात घ्यायला सकारात्मक भूमिका घेत नसल्याचं दिसून येत आहे.

त्याच मुळे “ना इधरके ना उधरके” अशी परिथिती क्षीरसागरांची झाली आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये रमले नाहीत. सेना नेतृत्वावर नाराज असल्याचे संकेत त्यांनी अनेकदा दिले. शिवसेनेकडूनही जयदत्त क्षीरसागर यांना फारसे बळ दिले गेले नाही. भाजप आणि शिंदे गटाची समीकरणे जुळल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघ कोण लढविणार हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे राजकीयदृष्टया गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची शिवसेनेत कुचंबणाच झाली असे सांगणारा त्यांच्या समर्थकांचा मोठा गट बीड जिल्ह्यात आहे. पण असे असतानाही त्यांना भाजपमध्ये अजूनही स्थान मिळाले नाही. शिंदे गटात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुरेश नवले गेल्याने त्यांना तिथेही जाणे अवघड झाले आहे. पुतण्या संदीप राष्ट्रवादीत असल्याने पुन्हा स्वगृही जाण्यातही त्यांना अडचणी असल्याने जयदत्त क्षीरसागर हे राजकीय गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.

तर जनतेच्या मनात क्षीरसागर भाजपच्या बाजूचे आहेत, असा संदेश दिला जात आहे. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेतले जात नाही. पंकजा मुंडे यांना न दुखावता बीड जिल्ह्यातील अन्य ओबीसी नेत्यास किती जवळ करायचे यावरून भाजपमध्येही संभ्रम असल्याने यातूनही दिसत कि जयदत्त क्षीरसागर यांची कोंडी झाली आहे. जयदत्त सखिरसागर यांनी त्यांची राजकीय सुरवात हि काँगेस मधून केली, राष्ट्रवादीच्या च्या स्थापने नन्तर त्यांनी राष्ट्रवादित प्रवेश केला ,माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते .,

४० वर्षा हुन अधिक काळ बीड जिल्याच्या राजकारणावर एक हाती नेतृत्व केलं , २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला .जून मध्ये शिवसेनेत फूट पडल्या नन्तर त्यांचं मन परत भाजप कडे वाळू लागलं . शिवसेना सोडल्या नन्तर लोकांना वाटू लागलं की आता क्षीरसागर हे भाजपा मध्ये प्रवेश घेतील पण, भाजप त्यांना आपल्यात सामावून घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

क्षीरसागरांशी शिवसेना पक्षाने संबंध तोडल्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.मात्र स्थानिक पातळीवर भाजपचा विरोध होत असल्या मुळे आता क्षीरसागर कुठलया पक्षात जातात हे बघने महत्वाचे असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button