हे होते अकबराच्या दरबारातले ‘नऊ’रत्न…
आपल्याकडे अकड्यांना एखाद्या गोष्टीसोबत जोडण्याची पद्धतच आहे. सप्त ऋषी, आठ प्रहर आणि तसेच काही नऊरत्न. नऊरत्न हा शब्द आला की प्रत्येकाला अकबराच्या दरबारातले नऊरत्न आठवतात.
पण हे नऊरत्न खरे होते का? खरे असतील तर त्यांची नावं काय आणि त्यांच्यातले कोणते गुण बघून त्यांना रत्न असा किताब दिला होता हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
अबुल फजल इब्न मुबारक असे ह्यांचे पूर्ण नाव. ह्यांने अकबराच्या काळातल्या गोष्टींना लेखनबद्ध केले होते. अर्थात आज जो काही अकबराचा इतिहास ग्राह्य धरला जातो ते लिहिण्याचे काम ह्याने केले होते.
ह्यांने अकबरनामा आणि आइन-ए-अकबरी नावाचे ग्रंथ लिहिले. ह्याने पंचतंत्रांचा फारसी अनुवाद केला होता. पुढे वीर सिंह बुंदेला ह्यांच्याहातून सलीमने अबुल फजलची हत्या घडवून आणली.
ह्यांचे पूर्ण नाव शेख अबू अल-फैज असे होते. ह्याचा जन्म आग्ऱ्यात झाला. असे म्हणतात की हे फैजी अबुल फजलचे बंधू होते. ह्याला कविता करण्याचा छंद होता.
फारसी भाषेची चांगली माहिती असल्याने तो कविता करायचा. गणितात देखील त्याला रस होता. अकबराने स्वतःच्या मुलांना गणित शिकवण्यासाठी त्याची नियुक्ती केली होती. ह्याने लीलावती नावाच्या ग्रंथाचा फारसी अनुवाद केला होता.
तानसेनला सारे लोक त्यांच्या कलेमुळे ओळखतात. तानसेन हे ग्वालीयरचे होते. राम तनु पांडे असे त्यांचे नाव सांगण्यात येते. काही लोक त्यांचे नाव तन्ना मिश्रा सांगतात.
तानसेन पूर्वी हरिदास ह्यांच्याकडे राहिले होते. नंतर मानसिंग ह्यांच्या विधवा पत्नीकडून तानसेन गाणं म्हणण्यास शिकले. तानसेन ह्यांस दीप राग गाण्यासाठी ओळखले जाते. ते स्वतः नवनवीन गाणी रचायचे आणि म्हणायचे. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांची ओळख सर्वदूर पसरली होती.
बिरबलाचे खरे नाव महेशदास असल्याचे सांगतात. बिरबल अत्यंत चतुर आणि हुशार होता. तो एक उत्तम कवी सुद्धा होता. ब्रह्म म्हणून त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत ज्या राजस्थान मधील भरतपूर संग्रहालयात ठेवल्या आहेत.
तोडरमलचा जन्म उत्तर प्रदेश मधील सितापूर जवळ लहारमध्ये झाला होता. हा अकबराच्या दरबारातील वित्तमंत्री होता. शिवाय भूभागाचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यालाच भूमीची व राज्याची मोजणी करण्यासाठी सांगितले जायचे. तोडरमलने भागवत पुराणाचा फारसी अनुवाद केला होता. त्याने अनेक ठिकाणी अकबराच्या राज्याचे कार्य केले.
राजा मानसिंग एक राजपूत होते व अकबराच्या सैन्याचे सेनापती होते. आमेर महालाचे निर्माणकर्ते मानसिंग होते. त्यांनी ओडिशा ते आसामचा भाग जिंकून अकबराला दिला होता. मानसिंग ह्यांना काबूल, बंगाल, बिहार इत्यादींचा शासक बनवण्यात आले होते. महाराणा प्रताप ह्यांच्या विरुद्ध अकबराने ह्याच मानसिंगांना पाठवले होते.
अकबराच्या एका संरक्षकाचा हा मुलगा. अब्दुल रहीम खान-ए-खाना उत्तम कवी देखील होता. ह्याने नगर शोभा नामक रचना केली होती. शिवाय बाबरनामाचा फारसी अनुवाद केला होता.
हकीमहुकाम हे अकबराचे मुस्लिम धर्म गुरू होते. त्या वेळेस दरबारात राजा व्यवस्थित राज्य करतो आहे की नाही हे पाहण्यासाठी धर्मातील जाणकार व्यक्ती दरबारात असायचे. हे तेच हकीमहुकाम.
याचे मूळ नाव अबुल हसन होते. तो अकबराचे वडील हुमायूं सोबत इराणहून भारतात आला होता. तो अकबराच्या दरबारातले अमात्य होता.
असे म्हणतात की हा समोरच्या व्यक्तीच्या युक्तिवादाचे उचित प्रकारे खंडण करायचा. नवरत्नातील एक फैजी हा हसन यांचा चांगला मित्र होता.
फैजी यांनी कांद्याचा विशिष्ट उपयोग करून बनवलेला ‘मुर्ग दो प्याजा’ हा पदार्थ हसन यास इतका आवडला की तो जिकडे जाईल तिकडे याचीच मागणी करायचा. मशिदीचा मुल्ला तो होताच. म्हणून याला ‘मुल्लाह दो प्याजा’ असे नाव पडले.